Chup Teaser out esakal
मनोरंजन

Chup Teaser: 'चूप' चित्रपटाचा टीझर रिलीज...अमिताभ बच्चन यांची शेअर केलाय व्हिडिओ

या चित्रपटाचा टीझर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय.

सकाळ डिजिटल टीम

'चूप द रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' हा सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते गुरू दत्त यांच्या बर्थ अॅनिवर्सरीनिमित्त हा टीझर रिलीज करण्यात आलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय.हा चित्रपट गुरू दत्त यांना श्रद्धांजली असल्याचे सांगितल्या जात आहे.या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार लवकरच पडद्यावर दिसणार आहेत.

फायटर अभिनेता सनी देओल बऱ्याच वर्षांनी परत एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.या चित्रपटाचा अनोखा टीझर अमिताभ बच्चन यांनी शेअर करताच प्रेक्षकांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला.मनाला स्पर्श करणारी ही कथा अनेकांना आवडलेली दिसते.या चित्रपटाच्या टीझरमध्ये सनी देओल,आणि पूजा भट्ट दिसतेय.

काय दिसतंय टीझरमध्ये ?

चित्रपटाचा टीझर दुलकर सलमानने सुरू होतो.टीझरमध्ये सलमान कागदाची फुले बनवताना दिसतोय.चित्रपटाचा टीझर दुलकर सलमानने सुरू होतो.टीझरमध्ये सलमान कागदाची फुले बनवताना दिसतोय.कागज के फूल चित्रपटाच्या ट्यूनवर यावेळी तो हॅप्पी बर्थडे गाताना दिसतो.बनवलेली कागदाची फुले दुलकर सलमान एका मुलीला देतो.त्यावेळी फुलं बघताच ती म्हणते कागज के फूल ? आणि पुढे सनी देओलची एन्ट्री बघायला मिळते.

दिग्दर्शक आर बाल्की यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांना मागल्या वर्षीपासून या चित्रपटाची कल्पना होती.आणि ही कथा आता पडद्यावर आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.गुरू दत्त आज यांचा वाढदिवस आहे.गुरू दत्त यांचं वयाच्या ३९ व्या वर्षीच निधन झाले होते.त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT