Shivaji Satam file photo
मनोरंजन

बँकेत नोकरी ते अभिनयविश्वात पदार्पण; शिवाजी साटम यांचा प्रेरणादायी प्रवास

शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

सीआयडीमधील एसीपी प्रद्युमन असो वा 'दे धक्का'मधील तळीराम, कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या साकारणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे शिवाजी साटम. चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून शिवाजी हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाजी साटम यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी झाला. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली. 1980 मध्ये रिश्ते-नाते या लोकप्रिय मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

शिवाजींच्या अभिनयातील बारकावे आणि सहजपणा अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांच्या पसंतीस पडला. 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'नायक', ‘ जिस देश मै गंगा रहता है’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच मराठीमधील उत्तरायण, दे धक्का, मी शिवाजी पार्क या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. संगीत वरद या संगीत नाटकातील शिवाजींच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले.

हेही वाचा : 'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा

1998 मध्ये प्रदर्शित झालेली सीआयडी या मालिकेतील शिवाजी यांच्या ‘दया कुछ तो गडबड है’, दया तोड दो दरवाजा’, हे डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाले. 2013 साली मालिका सोडून फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी सीआयडीमध्ये पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. शिवाजी साटम यांना 'ध्यानी मनी' या मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Nashik Hotel FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर मोठा धडाका! नाशिकमध्ये 20 हॉटेल्सवर अचानक धाड; 4 हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेश, 9 परवाने निलंबित

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

SCROLL FOR NEXT