Article 370 And Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya esakal
मनोरंजन

Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट

Cinema Lovers Day 2024: शुक्रवारी (23 फेब्रुवारी) 'सिनेमा लव्हर्स-डे' (Cinema Lovers Day 2024) साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेक्षक कोणताही चित्रपट 99 रुपयांना बघू शकणार आहेत.

priyanka kulkarni

Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी यंदाचा शुक्रवार खास असणार आहे. कारण PVR तुमच्यासाठीही एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) 'सिनेमा लव्हर्स-डे' (Cinema Lovers Day 2024) साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेक्षक कोणताही चित्रपट 99 रुपयांना बघू शकणार आहेत.

23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षक पीव्हीआर आयनॉक्सच्या कोणत्याही सिनेमागृहात जाऊन 99 रुपयात चित्रपट पाहू शकणार आहेत. ही ऑफर प्रीमियम फॉरमॅट आणि रिक्लिनर्स यासाठी ही ऑफर लागू होणार नाही. तसेच करांसह तिकिटांच्या किमती वाढू शकतात. ही ऑफर निवडक शहरांमध्येच लागू असेल. सिनेमा चेननं रिक्लिनर्स सीटसाठी तिकीटाची किंमत 199 रुपये केली आहे.

'हे' चित्रपट पाहा 99 रुपयात

यामी गौतमचा 'आर्टिकल 370' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. तसेच 'क्रॅक' हा चित्रपटही त्याच प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना 23 फेब्रुवारीला 99 रुपयांनामध्ये पाहता येणार आहेत. ऑल इंडिया रँक हा चित्रपट देखील या दिवशी रिलीज होणार आहे.

'मॅडम वेब', 'द होल्डओव्हर्स', 'बॉब मार्ले - वन लव्ह' सोबतच तुम्ही 'मीन गर्ल्स' आणि 'द टीचर्स लाउंज'हे हॉलिवूडचे चित्रपट 99 रुपयांमध्ये तुम्ही पाहू शकता.

23 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व तिकिटांची किंमत 75 रुपये ठेवण्यात आली होती. 2023 मध्ये, 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 6 दशलक्षाहून अधिक लोक थिएटरमध्ये पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT