Movie Ticket Price on 20th January Friday esakal
मनोरंजन

Movie Ticket Price : चित्रपटप्रेमींसाठी २० जानेवारीला 'सिनेमा लव्हर्स डे'! काय आहे भन्नाट ऑफर?

चित्रपटप्रेमींना गेल्यावर्षीची एक ऑफर आठवत असेल त्यावेळी राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा गेला होता.

सकाळ डिजिटल टीम

Movie Ticket Price on 20th January Friday : चित्रपटप्रेमींना गेल्यावर्षीची एक ऑफर आठवत असेल त्यावेळी राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा गेला होता. त्यादिवसाच्या निमित्तानं कुठलाही चित्रपट त्याच दिवशी फक्त ७५ रुपयांत पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एक मोठी घोषणा मल्टिप्लेक्स थिएटरनं केली आहे.

२० जानेवारीच्या निमित्तानं चित्रपटप्रेमींसाठी सिनेमा लव्हर्स डे साजरा केला जाणार आहे. यादिवशी तिकिटामध्ये मोठी सुट प्रेक्षकांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स असोशिएशनच्या वतीनं एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये यादिवशी प्रेक्षकांना अवघ्या ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. तिकिटावर जीएसटी लागू होणार नाही.

Also Read - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

Movie Ticket Price

चित्रपटप्रेमी आता २० जानेवारीला त्यांच्या आवडीचा कोणताही चित्रपट असोसिएशननं सांगितलेल्या किंमतीत पाहू शकणार आहे. या मल्टिप्लेक्स ऑर्गनायझेशनमध्ये पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या चित्रपटगृहांचा समावेश आहे. सिनेपोलिसनं तर सोशल मीडियावर देखील याविषयी पोस्ट शेयर केली आहे.

सिनेमा लव्हर्स डे च्या निमित्तानं ही ऑफर लागू आहे. त्याच दिवशी त्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. याशिवाय काही निवडक शहरांमध्येच ही ऑफर लागू करण्यात येणार आहे. याविषयीची अधिक माहिती ही पीव्हीआरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मल्टिप्लेक्सनं नॅशनल सिनेमा डे साजरा केला गेला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

मल्टिप्लेक्सनं असोशिएसने सांगितलेल्या माहितीनुसार, सिनेमा डेच्या निमित्तानं तब्बल ६५ लाख प्रेक्षकांनी त्या सुविधेचा लाभ घेतला होता. सिनेमा लव्हर्स डे ला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT