salman 
मनोरंजन

सलमानला अडवणाऱ्या CISF जवानावर कारवाई

'टायगर ३'च्या शूटिंगसाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर सलमानला अडवले होते.

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खान Salman Khan आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif हे आगामी 'टायगर ३' Tiger 3 या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी रवाना झाले. सलमानचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक CISF अधिकारी कागदपत्र तपासण्यासाठी सलमानला आत प्रवेश करण्यापासून अडवताना दिसत आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. सीआईएसएफ जवान सोमनाथ मोहंती यांचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.

का झाली कारवाई?

सलमानला विमानतळावर अडवल्यानंतर सोमनाथ हे माध्यमांशी बोलले होते. माध्यमांशी बोलणं हे प्रोटोकॉलचं उल्लंघन असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. त्याचसोबत यापुढे त्यांनी कोणत्याही माध्यमांशी संपर्क साधू नये, म्हणून त्यांचा फोन जप्त करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

सलमान कारमधून बाहेर पडताच तोंडाला मास्क लावून विमानतळाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागतो. प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच त्याला एक अधिकारी अडवतो आणि कागदपत्रांविषयी विचारतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सेलिब्रिटीच्या ग्लॅमरला न भुलता आपलं कर्तव्य बजावणारा अधिकारी, म्हणून त्याची स्तुती केली. 'गणवेशाची ताकद', अशी कमेंट एकाने केली. तर 'अधिकाऱ्याने ज्याप्रकारे सेलिब्रिटीला अडवलं, ते आवडलं', असं दुसऱ्याने लिहिलं होतं.

'टायगर ३' या आगामी चित्रपटाची शूटिंग पुढील ४५ दिवस परदेशातील विविध पाच ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये ऑस्ट्रिया आणि टर्की यांचाही समावेश आहे. हा संपूर्ण अॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यासाठी परदेशातील शूटिंगचं नियोजन करण्यात आलं आहे. 'टायगर ३' हा 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांच्या सीरिजमधला तिसरा भाग आहे. पहिल्या भागाचं दिग्दर्शक कबीर खान तर दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT