cm eknath shinde announce to give Sulochana didi state funeral
cm eknath shinde announce to give Sulochana didi state funeral  sakal
मनोरंजन

Sulochana Latkar death: सुलोचना दीदींवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.. मुख्यमंत्र्यांकडून सूचना..

नीलेश अडसूळ

Solochana Latkar Passed Away: मायेची पाखर घालणारी 'आई' ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. सर्वांच्या लाडक्या आणि गुरु स्थानी असणाऱ्या 'सुलोचना दीदी' यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.

त्या 94 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार 5 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी आज अत्यंत दर्शनासाठी ठेवणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. सुलोचना दीदी त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(cm eknath shinde announce to give Sulochana didi state funeral )

मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, 'सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः 'आई'च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.'

'दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल.'

पुढे ते म्हणाले की, 'काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी "आई' गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी,' अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सूचना देऊन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आज सुलोचना दीदींना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT