Cm Eknath Shinde Visit Director Viju Mane Home For Ganpati Darshan Post viral Esakal
मनोरंजन

Viju Mane Post: 'साहेबांची तब्येत बरी नाही तरीही.., ' विजू मानेंच्या घरी मुख्यमंत्री गणपती दर्शनाला! पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

दिग्दर्शक विजू माने हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. ते अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा मनोरंजन विश्वातील घडामोडी त्यांचे मत मांडत असतात. विजू माने यांच्या घरी गणपती बसला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी गणपती दर्शन घेत आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजू माने यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आहे. गणरायाचा आशिर्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी विजू माने यांच्या कुटूंबाची भेट घेतली. सोशल मीडियावर फोटो शेयर करत विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.

विजू माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, "राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास २० वर्ष ( कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता ह्या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले. मी, माननीय शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटी गाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु, सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे.

राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं. थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही. माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.

कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे."

सध्या विजू माने यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक विजू माने सध्या त्यांच्या ‘स्ट्रगलर साला सीझन तीन’मुळे चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT