comeback of miss universe in Bollywood after ten years  
मनोरंजन

विश्वसुंदरीचं बॉलिवूडमध्ये 10 वर्षांनी कमबॅक !

वृत्तसंस्था

मुंबई : विश्वसुंदरी म्हणजे 'ब्युटी विथ ब्रेन' असं कॉम्बिनेशन. आजवर झालेल्या विश्वसुंदरी या चित्रपटसृष्टीमध्ये किमान एक दोन चित्रपटांमधून तरी काम करतातच. पण प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या रॉय या अभिनेत्रींनी विश्वसुंदरीचा टॅग जिंकून बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे.सुश्मिता सेन हिनेदेखील विश्वसुंदरी बनली आणि बॉलिवूडमध्ये दमदार चित्रपटही केले. गेल्या काही वर्षांपासून मात्र ती सिनेमांपासून दूर होती.

1994 मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकावणारी सुश्मिता पहिली भारतीय महिला होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. इतक्या लहान वयात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविल्यामुळे तिचे जगभरातून कौतुक झाले होते. लहान वयातच सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं. रिना आणि आलिशा असं त्या मुलीचं नाव आहे.  तिने आजवर लग्न केलं नसलं तरी मात्र ती डेट करत होती. सुश्मिता आता तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान रोहमान शॉलला डेट करतेय. रोहमानआधी सुश्मिताने अनेक पुरुषांना डेट केलं आहे. चाळीशी ओलटलेली सुश्मिता आताही सुपरफिट आणि तिची मेन्टेन आहे. योग आणि जिम ती दररोज करते आणि आजही तिने स्वत:ला फिट ठेवलं आहे. ही विश्वसुंदरी आता तब्बल दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 

सुश्मिता सेन बॉलिवूडमध्ये येणार असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे. चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला असून अभिनंदन करत लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. खिडकीमधील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये सुश्मिताने लिहिलं आहे, 'मी मोठ्या प़द्यावर पुन्हा यावं अशी माझ्या चाहत्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी 10 वर्षे वाट पाहिली. त्यांचा माझ्यावरील विश्वास आणि संयम मला आवडतो. तुमच्यासाठी मी परत येतेय' अशी पोस्ट करत तिने #seondinnings असा हॅशटॅगही वापरला आहे. सुश्मिताच्या या पोस्टला रिपोस्ट करत रोहमानने 'वेलकम बॅक, मला तुझा अभिान आहे' असं लिहिलं आहे. 

लोकांसाठी झटणारी अभिनेत्री म्हणूनही सुश्मिताचे नाव घेतले जाते. ती स्वतः एक चॅरिटेबल फाऊंडेशन चालवते. तिला लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडतो. लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी तिचे फाऊंडेशन काम करते.

सुश्मिता कोणत्या चित्रपटामधून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र तिच्या या घोषणेनंतर प्रेक्षक आणि नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT