Subi Suresh Passes Away Esakal
मनोरंजन

Subi Suresh Passes Away: प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही होस्टचं निधन

कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश हिचं वयाच्या अवघ्या 41 वर्षी निधन झालं. मिळालेल्या माहिती नुसार ती यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त होती

सकाळ डिजिटल टीम

Subi Suresh Passes Away: कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश हिचं वयाच्या अवघ्या 41 वर्षी निधन झालं. मिळालेल्या माहिती नुसार ती यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरु होते. आज म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी सकाळी कोची येथील एका खासगी रुग्णालयात सुबीनं अखेरचा श्वास घेतला.

सुबी सुरेशने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर ती स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागली. तिच्या एव्हरग्रीन कॉमेडी शोमधील तिच्या विनोदी पात्रांसाठी सुबी सुरेश ही लोकप्रिय होती. तिच्या विनोदी शैलीमुळं ती घराघरात प्रसिद्ध झाली. कॉमेडी शो बरोबरच ती चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये सक्रिय झाली आहे. शेवटी ती 'कुट्टी पट्टलम' या शो मध्ये दिसली होती. तिने 'गृहनाथन', 'Thaksara Lahala ', 'एलसम्मा एन्ना आंकू...' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्येही काम केले.

साऊथ फिल्म इंडस्ट्री कोणाची नजर लागल्याचं सर्वत्र बोललं जात आहे . गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक अनेक सेलेब्सच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांचे मन हेलावले आहे. आता मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश यांचे निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT