Vir Das sakal
मनोरंजन

काॅमेडियन वीर दासची पुन्हा जीभ घसरली; म्हणाला - देशात कोणालाही मारले...

काॅमेडियन वीर दासचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Comedian Vir Das : स्टँड अप काॅमेडियन वीर दास आणि मुनव्वर फारुकी या दोघांचा वादाशी खूप जुनं नात आहे. आता वीर दासने (Comedian Vir Das) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन देशाच्या भावनांची टर उडवली आहे. व्हिडिओत तो म्हणाला, देशात काॅमेडियनला कधीही श्रीमुखात लगावले जाऊ शकते. आपण तो कोणी लगावला हे विचारत नाही. उलट आपण विचारतो का मारला? या प्रश्नाचे उत्तर देत स्वतः वीर दास म्हणतो, देशद्रोह, मानहानी आणि भावना दुखवल्याच्या नावाखाली कोणालाही श्रीमुखात मारले जाऊ शकते.

त्याने सदरील व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याचा हा व्हिडिओ कोणत्या तरी जुन्या कार्यक्रमाचा क्लिप आहे. यात वीर दास हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की भारतात (India) भावना दुखवण्याच्या नावावर कोणालाही शिक्षा किंवा श्रीमुखात लगावले जाऊ शकते. त्याच्या या नवीन व्हिडिओ पोस्टला ६ हजारपेक्षा जास्त लाईक्स आणि ५० पेक्षा अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत.

लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

लोकांनी वीर दासच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, तर तुमच्या मते नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना भावना दुखवल्याच्या नावावर अटक करायला हवी. मात्र अश्लील काॅमेडी करणाऱ्या काॅमेडियनला नाही. काय हा दुटप्पीपणा ! एक यूजर म्हणतो, जर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर अश्लील काॅमेडी करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर अशीच हिंमत दुसऱ्या धर्मांविषयी का करत नाही. का त्यांना असे केल्याने गळा कापण्याची भिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT