Tim Sale Passes Away esakal
मनोरंजन

कॉमिक बुक आर्टिस्ट टिम सेल यांचं निधन; 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ डिजिटल टीम

टिम सेल यांच्या मृत्यूची माहिती ट्विटच्या माध्यमातून समोर आलीय.

Tim Sale Passes Away : 'द लाँग हॅलोवीन'सारख्या प्रतिष्ठित कथांसाठी प्रसिद्ध झालेले कॉमिक बुक आर्टिस्ट (Comic Book Artist Tim Sale) टिम सेल यांचं आज शुक्रवार, 17 जून रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूबाबत फारशी माहिती समोर आलेली नाहीय. ते 66 वर्षांचे होते.

टिम सेलनं बॅटमॅन: द लाँग हॅलोवीन, बॅटमॅन नॉयर : डार्क व्हिक्ट्री, कॅटवुमन : व्हेन इन रोम यासारख्या कॉमिक बुक लेखक जेफ लोएबसह बॅटमॅन कॉमिक्सचं अनेक चित्रण केलं आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती ट्विटच्या माध्यमातून समोर आलीय. हे ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, टिम सेलच्या निधनानंतर डीसी कॉमिक्सनंही त्यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. डीसी कॉमिक्सनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'टिम सेल एक अविश्वसनीय कलाकार होता. त्याच्या पेज डिझाइननं कॉमिक बुक स्टोरीटेलिंगबद्दल संपूर्ण पिढीचा विचार बदलला. टिमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत आमच्या संवेदना कायम असून टिमची उणीव आपल्या सगळ्यांनाच जाणवेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT