Vivek Agnihotri Google
मनोरंजन

The kashmir Files च्या दिग्दर्शकाविरोधात पत्रकाराची पोलिसात तक्रार

भोपाळी नागरिकांना समलिंग संबोधल्यासंदर्भात ही तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. वादांनी तर या सिनेमाला घेरलेलेच आहे. द काश्मिर फाईल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी भोपाळी नागरिकांना समलिंगी म्हणून संबोधल्याबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला होता. आता याच वक्तव्यावरुन 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज करणारा पत्रकार रोहित पांडे(Rohit Pande) नं ही तक्रार वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. रोहित पांडेचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी सेक्शन 153A,153B,295A,500,505(2) अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी भोपाळी हे समलैंगिक असल्याचे म्हटले होते. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले. त्यांना वेगवेगळ्या कमेंटस् देऊन त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. अग्निहोत्री यांचे म्हणणे होते की, ''भोपाळी या शब्दाचा अर्थ होमोसेक्शुअल असा आहे. आपल्यापैकी अनेकांना त्याचा अर्थ माहिती नाही. त्यामुळे मी जे काही बोलले आहे त्याचा चूकीचा अर्थ काढला जात आहे''.

या तक्रारीत तक्रारदार असलेल्या पत्रकाराच्या वकिलांनी काही मुद्दे स्पष्ट करत म्हटलं आहे की,माझ्या अशिलाला सिनेमाविषयी प्रेम आहे. त्यात दाखवलेल्या सत्य घटनेला त्यानं आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही केलेलं आहे. पण तो स्वतः भोपाळचा रहिवासी आहे. त्याला आपल्या शहराचा,तिथल्या लोकांचा अभिमान आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी तिथल्या लोकांना समलिंगी संबोधल्यानं आपल्या भावना दुखावल्या आहेत. आणि त्याविरोधात आपण ही तक्रार दाखल करत आहोत. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ सोशल मीडियावर लावल्यानंतर स्पष्टिकरण दिलं होतं. पण आता चक्क तक्रार दाखल झालीय. त्यामुळे वादांचा ससेमिरा द काश्मिर फाईल्सच्या मागे सुरूच असल्याचं चित्र पुन्हा दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT