popular music director shravan rathod  Team esakal
मनोरंजन

प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनाने निधन

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

स्वाती वेमूल

साजन, दिवाना, आशिकी, दिल है मानता नही अशा अनेक हिंदी चित्रपटांना एकापेक्षा एक सुमधूर संगीत देणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण या जोडीपैकी श्रवणकुमार राठोड यांचे कोरोनाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. नव्वदच्या दशकात नदीम-श्रवण ही जोडी कमालीची लोकप्रिय होती. त्यांनी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, अभिजीत, एस. पी. बालसुब्रमण्यम, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम यांसारख्या जवळजवळ सर्व आघाडीच्या गायकांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली.

'दंगल' या भोजपुरी चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर हिंदीतील काही छोट्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मात्र महेश भट्ट यांच्या 'आशिकी' या चित्रपटानंतर त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रोमँटिक गाणी चांगलीच गाजली. या संगीतकार जोडीने 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT