Sukesh Chandrashekhar On Jacqueline Fernandez
Sukesh Chandrashekhar On Jacqueline Fernandez Esakal
मनोरंजन

Sukesh Chandrashekhar: तुरुंगात फुलतेय सुकेश-जॅकलीनची 'लवस्टोरी'! आता थेट तुरुंगातुन करणार धमाका.. प्रेमपत्र व्हायरल

Vaishali Patil

महाठग सुकेश चंद्रशेखर जरी सध्या तुरुंगात असला तरी तो नेहमीच चर्चेत असतो. 200 कोटी रुपये आणि खंडणीच्या आरोपाखाली सध्या तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुगांत असुनही तो जॅकलिनचा पाठलाग करतांना दिसत आहे. तुरुंगात राहूनही सुकेश नेहमीच चर्चेत आहे. तो नेहमीच स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवत आहे.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पुन्हा एकदा तुरुंगातून प्रेमपत्र लिहिले आहे. याआधीही सुकेशने जॅकलीनला प्रेमपत्र पाठवले आहेत.

सुकेशने लिहिलेल्या पत्रात त्याने जॅकलिनसाठी अनेक प्रेमळ शब्द वापरले आहेत. यासोबतच त्याने जॅकलिनच्या वाढदिवशी तिला सुपर सरप्राईज देण्याचंही सांगितले आहे आणि त्याने सरप्राईज पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे.

माय लव्ह, माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा मी 28 एप्रिला फिल्मफेअर अवॉर्ड्स पाहिला. तू उत्कृष्ट आहेस आणि तुझा अभिनय सर्वोत्तम होता. संपूर्ण शोमध्ये तुझा डान्स अ‍ॅक्ट अप्रतिम होता, बेबी तू खूप हॉट दिसत होतीस आणि तू मला तुझ्या आणखी प्रेमात पाडलयं. माझ्याकडे शब्द नाहीत, तू एक बॉम, सुपर स्टार, माई बेबी गर्ल आहेस.

माझी राणी, तू माझ्या आयुष्यात आहेस त्यामुळे मी धन्य आहे. बोटा बोम्मा, मी तुला माझे सर्वस्व मानतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्रत्येक सेकंदाला मी तुझ्याबद्दल विचार करतो, तुला माहित आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो.

आपलं बोलणे पूर्ण करताना सुकेशने लिहिले की, त्याला जॅकलिनची खूप आठवण येते. तो तिच्यावर किती प्रेम करतो हे सांगायला त्याच्याकडे शब्द नाहीत. आणि जॅकलिनवरील प्रेमासाठी त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तो तिच्यावर खूप विश्वास ठेवतो. सुकेश चंद्रशेखरचे संपूर्ण पत्र फक्त आणि फक्त जॅकलिनभोवती फिरताना दिसत होते.

सुकेशच्या म्हणण्यानुसार, याशिवाय त्याने जॅकलिनच्या वाढदिवसासाठी एक सुपर सरप्राईज प्लॅन केला आहे, जो पाहून ती खूप खूश होईल. सुकेशही पत्रात दिलेले वचन पूर्ण करण्याबाबत बोलताना दिसत आहे. हे पत्र सुकेश चंद्रशेखर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिले आहे. ज्याची सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सुकेशचा वकील अनंत मलिक यांच्यामार्फत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रात सुकेशने जॅकलिनवरचे त्याचे प्रेम आणि तो तिला किती मिस करत आहे हे व्यक्त केले आहे. अलीकडेच फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करताना त्याने तिला सुपरस्टार म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT