Sukesh Chandrashekhar On Jacqueline Fernandez Esakal
मनोरंजन

Sukesh-Jacqueline: सुकेशला तुरुंगात करमेना! जॅकलिनला पुन्हा प्रेमपत्र लिहित म्हणाला, 'तू ही मला मिस करतेस'

Vaishali Patil

Sukesh Chandrashekhar On Jacqueline Fernandez: महाठग सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली तुरुंगात बंद आहे. सुकेशवर अनेक आरोप आहेत आणि त्याच्यावर केसही सुरु आहे. मात्र सुकेश तुरुंगातही शांत बसण्याच नाव घेत नाही असं काहीस चित्र आहे. तो काही ना काही असं करतो की त्याची चर्चा रंगते.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला प्रेम पत्र लिहिले आहे. ही काही त्याची पत्र लिहिण्याची पहिली वेळ नाही. याआधीही त्याने दोनवेळा तिला पत्र पाठवले आहे.

पुन्हा एकदा सुकेशने जॅकलिनला पत्र लिहिलयं आणि या पत्राच्या माध्यामातुन इस्टरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशने पत्रात जॅकलीनचे सुंदर पद्धतिने वर्णन देखील केले आहे.

सुकेशकडून आलेल्या या पत्रात जॅकलिनवर खूप प्रेमाचा वर्षाव करण्यात आला आहे. पत्रात लिहिले आहे, “जॅकलिन माय बेबी, माय बोम्मा. बाळा मी तुला ईस्टरच्या शुभेच्छा देतो. हा तुमचा सर्वात आवडता सण आहे. आणि ईस्टर एग्सबद्दल तुझे प्रेम. मला तुमच्याबरोबर त्यांचीही आठवण येते."

Sukesh Chandrashekhar Jacqueline Fernandez wishing her on Holi festival old letter

पुढे लिहिले आहे की, “तुझ्यात असलेल्या त्या लहान मुलाला पाहण्यापासून मी रोखू शकत नाही जो अंडी फोडतो आणि त्यात कँडी ओततो…

तुला काही कल्पना आहे की तु किती गोड आणि सुंदर आहेस. या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही नाही…माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो.

त्याने या पत्रात जॅकलिनला आश्वासन दिलं आहे की ही वेळही निघून जाईल आणि सगळे पहातच राहतील. यासोबतच त्याने जॅकलिनला या पत्रात अनेक वचनही दिले आहेत.

त्याबरोबर प्रत्येक क्षणी तो जॅकलिनची आठवण काढतो असंही म्हटलं आहे. इतकंच नाही तर सुकेश म्हणाला की, 'मला माहीत आहे की, तुलाही प्रत्येक क्षणी माझी आठवण येते.'

त्याबरोबर सुकेशने पुढे म्हटलयं की पुढचा इस्टर असा असेल की पूर्वी तिने तो कधीच साजरा केला नसेल. यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT