Jacqueline Fernandez, Sukesh Chandrasekhar Google
मनोरंजन

सुकेशने जेलमधून लिहिलेल्या पत्रात जॅकलिन संदर्भात केला मोठा खुलासा

मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून, तो सध्या या तिहार जेलमध्ये आहे.

प्रणाली मोरे

जॅकलिन फर्नांडिसच्या(Jacqueline Fernandez) आयुष्यात सुकेश नावाचं वादळ काय येऊन गेलं की तिचं संपूर्ण आयुष्यच त्यानं ढवळून निघालं. आजपर्यंत तिच्या सिनेमांची जितकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar)सोबतच्या तिच्या कथित संबधामुळे झाली आहे. काही दिवसांपूर्वी सुकेशसोबतचे जॅकलिनचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर जॅकलिनने आपल्याला फसवलं जात आहे हे सांगतानाच सुकेशने कसं मोठ्या लबाडीनं आपल्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढलं याविषयी स्पष्टिकरण दिलं होतं पण आता सुकेशने मात्र जॅकलिनच्या समर्थनार्थ बाजू मांडलेली दिसून आली आहे. त्याला त्या व्हायरल झालेल्या खाजगी फोटोंविषयी कळताच त्याला वाईट वाटलं. गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी सुकेशने एक पत्रक जाहिर केलं. यामध्ये त्याने जॅकलिनची बाजू मांडताना म्हटलं आहे,''या प्रकरणात तिचा काहीही संबंध नाही.'' तसंच,खाजगी फोटो लीक होण्यासंदर्भात भाष्य करताना तो म्हणाला की,'' हे गोपनीयतेचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. जे खरंतर कायद्याने गुन्हा आहे''.

सुकेश चंद्रशेखरने आपल्या वकिलामार्फत पत्र लिहून ही नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे की,''मी माझे खाजगी फोटो पाहिले,जे व्हायरल झाल्यामुळे मला खूप वाईट वाटले. गेल्या आठवड्यात बातमीच्या माध्यमातून मला याची माहिती मिळाली. हे एकप्रकारे एखाद्या गोपनीयतेचे उल्लंघन करणारं कृत्य आहे. मी सर्वांना विनंती करतो की,जॅकलिनची चुकीची प्रतिमा दाखवू नका. कारण तिच्यासाठी हे सगळं सोपं नाही आहे''. सुकेशने पुढे म्हटलं आहे की,''मी याआधीही सांगितलं होतं की जॅकलिन आणि मी रीलेशनशीपमध्ये होतो. आम्ही एकमेकांना डेट करीत होतो. आणि आमचे नाते कोणत्याही पैशाच्या फायद्यावर आधारित नव्हते. तिने माझ्यावर निस्वार्थी प्रेम केले. आमच्या नात्यात प्रेम आणि आदर दोन्ही होते. आम्हाला एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. जॅकलिनचा माझ्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. जे मी यापूर्वीही सांगितले आहे''.

सुकेशने या पत्रात जॅकलिन आणि कुटुंबाला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंचाही उल्लेख केला आहे. सुकेशने लिहिले आहे की,''जॅकलिन किंवा तिच्या कुटुंबासाठी मी दिलेल्या महागड्या भेटवस्तू या सामान्य गोष्टी आहेत. हे खासगी आहे,या सगळ्या गोष्टींना इतकं का महत्त्व दिलं जात आहे हे मला अजूनही कळत नाही. हे कुणीही प्रेमासाठी करते. या वस्तू माझ्या वैध कमाईतल्या आहेत आणि मी हे लवकरच न्यायालयात सिद्ध करीन''. मी पन्हा हात जोडून विनंती करतो की, ''या सगळ्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीनं घेऊ नका. कृपया जॅकलिनला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण तिनं काहीही चुकीचं केलं नाही. कोणतीही आशा न ठेवता तिने प्रेम केले आहे''. सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू म्हणून ५६ लाखांचा घोडा,३६ लाखांच्या चार मांजरी दिल्या आहे. आता सुकेशच्या या पत्रात किती खरं आणि किती खोटं. की पुन्हा जॅकलिनला गोत्यात आणण्याचा हा प्रयत्न आहे त्याचा कुणास ठाऊक. आता यावर जॅकलिन काय स्पष्टिकरण देते याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT