मनोरंजन

'महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाकडं दुर्लक्ष', मानसीची पोस्ट

युगंधर ताजणे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात Independent India अनेकांचे बलिदान आहे. त्यात वेगवेगळया धर्माचे, समाजातील व्यक्तींचा सहभाग आहे. देशातल्या अनेक राज्यांतील नेत्यांच्या योगदानानं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. हे आपल्याला माहिती आहे. मात्र यासगळ्या लढ्यात महिलांच्या संघर्षाकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही. त्यांच्या योगदानाची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही. अशा आशयाची एक पोस्ट प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईकनं actress manasi naik लिहिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. मानसी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर करुन चाहत्यांच्या चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

मानसीनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं एक खास फोटोशुट केलं आहे. आणि ते फोटो फेसबूकवर पोस्ट केले आहेत. त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत. त्या पोस्टमध्ये आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्तानं भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात ती म्हणते, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्याचा उल्लेखही आहे. त्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. मात्र आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नाही. आपण खरं तर त्यांच्या या योगदानासाठी त्यांना उभं राहून मानवंदना द्यायला हवी. त्यांचा संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. याचा विचार आपण करायला हवा. त्या महिला शूर आणि निडर होत्या.

मात्र यासगळ्यात आपल्याला त्यांच्या त्या संघर्षाचा विसर पडला की काय असे वाटते, आपण त्यांच्या त्या योगदानाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. अशी खंत मानसीनं यावेळी व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ज्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या योगदानाची नोंद आपण घ्यायला हवी. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही महिलांच्या योगदानाच्या उल्लेखाअभावी अपूर्ण आहे. असे आपल्याला वाटते. हे मानसीनं म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं आपण त्या महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा.

एक कलाकार म्हणून हे माझ्यासाठी अभिनास्पद आहे की मी एका गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. मला भविष्यात एका स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका करायची इच्छा आहे. मानसीनं आपली ही पोस्ट महिला स्वातंत्र्यसैनिकांना अर्पण केली आहे. याबरोबरच तिनं आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: तो पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

Munjya Teaser: "मुन्नी बदनाम हुई गाणं ऐकायला तो आला अन्..."; 'मुंज्या' चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलात?

SCROLL FOR NEXT