aryan khan cordelia cruise sakal media
मनोरंजन

चांगला माणूस होईन, NCB ला अभिमान वाटेल; समुपदेशनात आर्यनचे वचन

एनसीबीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींचं समुदेशन केलं जातं.

सुधीर काकडे

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचं एनसीबीच्या कस्टडीत असताना समुपदेशन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आपण इथून बाहेर पडल्यानंतर चांगला माणूस बनवून दाखवणार असा शब्द आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या प्रत्येक आरोपीचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून आणि सामाजिक संस्थांकडून समुपदेशन केलं जात, त्यानुसार ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान याचही समुपदेशन करण्यात आलं.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वतःसुद्धा आर्यन खानचं समुपदेशन केलं असून त्यावर आर्यन खानने सकारात्मक प्रतिक्रीया दिल्याचं सांगण्यात येतंय. "इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिबांसाठी आर्थिक आणि सामाजिक पातळीवर काम करण्याचा प्रयत्न करेन. चुकीच्या गोष्टीत पुन्हा नाव येईल असं वागणार नाही", असा शब्द आर्यनने एनसीबी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

'काही महिन्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना स्वतः आर्यन खानबद्दल गर्व वाटू लागेल अस काम करण्याचा प्रयत्न करेन' असंही आर्यन खानने वचन दिल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT