Court Directs karnataka Police To write Fir Kangana Ranaut Over Her Tweet
  Court Directs karnataka Police To write Fir Kangana Ranaut Over Her Tweet 
मनोरंजन

वाचाळपणा कंगणाला भोवणार ?; न्यायालयाचे पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आदेश 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वाद, भांडण, कुरापती यासाठी कुठलाही विषय वर्ज्य नसलेल्या अभिनेत्री कंगणा राणावतची डोकेदुखी वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरुन कंगणा प्रचंड चर्चेत आली आहे. तिने आतापर्यत राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, कायदा सुव्यवस्था, यासारख्या विषयावर केलेल्या भाष्यांमुळे ती अनेकांच्या टीकेचा विषय ठरली आहे.

आता कर्नाटक पोलिसांना कंगणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी तिने  कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल एक ट्वीट केले होते. त्यावरुन तिला अनेकांचा रोष पत्करावा लागला होता. आता कंगनाविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे आदेशच न्यायालयानं दिल्याने तिची डोकेदुखी वाढणार आहे. कर्नाटकातील तुमकुरू जिल्हा न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले. वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयां क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

“कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये कंगणाने ट्विट करुन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.याबाबत अधिक माहिती देताना वकील रमेश नाईक म्हणाले, “आपण दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयानं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास तसंच याप्रकरणी तपास करण्यास सांगण्यात आले आहे.

 विधेयकांचं कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषी विषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले. त्या विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर  कंगणाने मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आणि या विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT