aashalata wabgaonkar 
मनोरंजन

अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. आशालता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 'काळुबाईच्या नावाने चांगलभलं' या मालिकेत त्या सध्या काम करत आहेत. या मालिकेचं शूटींग साता-यात सुरु होतं. 

'काळुबाईच्या नावाने चांगलभलं' या मालिकेचं शूटींग साता-यात सुरु होतं. या सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर येतंय. मुंबईवरुन आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

साता-याजवळील वाई येथील हिंगोली गावात एक फार्महाऊसवर या मालिकेचं शूटींग सुरु होतं. आशातला या साता-यात शूटींग करत होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली होती. आज त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याने साता-यातील शूटींग थांबवण्यात आलं होतं. मात्र यातील अनेक जण आता बरे होत असल्याने मुंबईत शूट सुरु करण्यात आलं आहे. मात्र आशालता या साता-यातंच आहेत.

काळुबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आहेत. कोरोनाच्या काळात शुटींगला परवानगी देण्यात आली असली तरी यादरम्यान नियमांचं पालन देखील महत्वाचं आहे. सेटवर नियमांचं पालन करत काळजी घेतली जात असताना देखील एवढ्या जणांना कोरोनाची बाधा कशी झाली यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.  

covid 19 veteran actress ashalta wabgaonkar on ventilator in hospital  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT