Crakk Review esakal
मनोरंजन

Crakk Review: साधारण कथेला अ‍ॅक्शन सीन्सचा आधार; विद्युत जामवालचा 'क्रॅक' पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

Crakk Review: 'क्रॅक' हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Crakk Review: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांचा 'क्रॅक - जीतेगा तो जिएगा!' (Crakk - Jeetega To Jiyega!) हा चित्रपट रिलीज झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही नेटकऱ्यांना या चित्रपटाची कथा साधारण वाटत आहे तर या चित्रपटातील ॲक्शन आणि स्टंट्सनं काही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आदित्य दत्तने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'क्रॅक' हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

क्रॅक पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

एका नेटकऱ्यानं क्रॅक चित्रपट पाहिल्यानंतर ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं, "स्मॅशिंग हिट, विद्युत जामवालचा पॉवरफुल परफॉर्मन्स, ॲक्शन सीन्स मनाला भिडणारे आहे, कथानक छान आहे पण दिग्दर्शन टॉप लेव्हल आहे, नोरा फतेही हा या चित्रपटाचा कणा आहे आणि अर्जुन रामपाल हा या चित्रपटाचा यूएसपी आहे."

"विद्युत जामवालचे जबरदस्त स्टंट चित्रपटात आहेत. हा चित्रपट नाही, 'फन ऑन द रन' आहे!" असंही एका नेटकऱ्यानं ट्विटमध्ये लिहिलं. या नेटकऱ्यानं क्रॅक या चित्रपटाला चार स्टार्स दिले आहेत.

99 रुपयांमध्ये बघा 'क्रॅक'

क्रॅक हा चित्रपट आज तुम्ही 99 रुपयांमध्ये पहू शकता. कारण आज सिनेमा-डे लव्हर्स आहे. त्यामुळे तिकीटांची किंमत कमी करण्यात आली आहे. बुक माय शो या अॅपवरुन तुम्ही क्रॅक चित्रपटाचे तिकीट बुक करु शकता.

बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार क्रॅक?

विद्युत जामवालचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. अशताच आता क्रॅक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ओपनिंग-डेला किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT