Yogesh Sohani Sakal
मनोरंजन

अभिनेत्याला लुटणारा सराईत गुन्हेगार अटकेत

मराठी मालिकेतील अभिनेता योगेश सोहनी यांना धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

मकरंद पटवर्धन -सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मराठी मालिकेतील अभिनेता योगेश सोहनी (Yogesh Sohani) यांना धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Police) खंडणी विरोधी पथकाने अटक (Arrested) केली आहे. (Criminal arrested for Robbing Actor)

योगेश सुरेश गिरी (वय ३७, रा. नऱ्हे आंबेगाव, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. मराठी मालिकेतील अभिनेते योगेश माधव सोहनी (वय ३२, रा. मुंबई) हे शनिवारी (ता.८) कारमधून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईहून पुण्याकडे जात होते. दरम्यान, सोमाटणे उड्डाण पुलाजवळील बाह्यमार्ग येथे मोटारीतून आलेल्या आरोपीने त्यांना हात दाखवून थांबविले. 'तुझ्या गाडीने अपघात केला असून, यात एक जण जखमी झाला आहे. याबाबत आपण पोलिसांत तक्रार देणार असून, पोलिस तक्रारीतून वाचवण्यासाठी सव्वा लाख रुपये देण्याची मागणी केली.

दरम्यान, सोहनी यांना सोमाटणे येथील एटीएममधून पन्नास हजार रुपये काढून देण्यास भाग पाडले. पैसे हातात मिळताच आरोपी मोटारीसह पसार झाला. याप्रकरणी शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल होता. दरम्यान, खंडणी विरोधी पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना सोहनी यांना लुटणारा आरोपी गिरी असून तो पाषाण-सुसगाव रोड येथे आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गिरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी -चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण हद्दीत चोरी, जबरी चोरी, खंडणी व फसवणुकीचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT