Critics Choice Awards esakal
मनोरंजन

Critics Choice Awards: 'बारावी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा क्रिटिक्स चॉईस पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

Critics Choice Awards: चैतन्यमय आणि जोशपूर्ण वातावरणात क्रिटिक्स चॉईस पुरस्कार (Critics Choice Awards) सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला.

priyanka kulkarni

Critics Choice Awards: एकापाठोपाठ एक कलाकारांचे आगमन होत होते. रेड कार्पेटवर त्यांची छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली दिसत होती. कुणाला पुरस्कार मिळणार, कोणता चित्रपट वा वेबसीरिज बाजी मारणार,कोणता लघुपट सर्वोत्कृष्ट ठरणार, याची आपापसात कुजबुज सुरू होती. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचे चैतन्य दिसत होते. अशाच चैतन्यमय आणि जोशपूर्ण वातावरणात क्रिटिक्स चॉईस पुरस्कार (Critics Choice Awards) सोहळा पार पडला.

वांद्रे-कुर्ला संकुलातील एका पंचतारांकित हॉटेलात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये करण जोहर, विद्या बालन, किरण राव, मौसमी चॅटर्जी, अनिल कपूर, सिद्धार्थ रॉय-कपूर, मीनाक्षी शेषाद्री, विक्रमादित्य मोटवानी, श्रिया पिळगावकर, कोंकणा सेन शर्मा, अमृता सुभाष, दिव्या दत्ता, कबीर खान, अली फजल, रिचा चढ्ढा, स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी आदी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींचा समावेश होता. या वेळी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘बारावी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी विधू विनोद चोप्रा म्हणाले, समीक्षकांच्या नजरेतून हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, याचा मला आनंद होत आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे. या वेळी ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘बारावी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शेफाली शहा (थ्री ऑफ अस) गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट वेबसीरिजचा मान ‘कोहरा’ या सीरिजला मिळाला. तसेच वेबसीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता सुविंदर विक्की (कोहरा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर) यांना गौरविण्यात आले. ‘कॉफी विथ करण’साठी सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून करण जोहरला गौरविण्यात आले. डिस्ने हॉट स्टारला सर्वोत्कृष्ट ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून पुरस्कार देण्यात आला.

वाचा क्रिटिक्स चॉईस पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी-

चित्रपट विभाग-

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : जयदीप अहलावत (जाने जाँ)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : दीप्ती नवल (गोल्डफिश)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : पीएस विनोथराज (तमिळ चित्रपट : कूझंगल (पेबल्स))

सर्वोत्कृष्ट लेखक : देवाशिष माखिजा (जोरम)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर : अविनाश अरुण (थ्री ऑफ अस)

सर्वोत्कृष्ट संकलक : अभ्रो बॅनर्जी (जोरम).

वेबसीरिज विभाग

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सिद्धांत गुप्ता (ज्युबिली)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अमृता सुभाष (लस्ट स्टोरीज सीझन २)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी (ज्युबिली)

सर्वोत्कृष्ट लेखक - गुरजित चोप्रा, दिग्गी सिसोदिया, सुदीप शर्मा (कोहरा)

लघुपट विभाग

सर्वोत्कृष्ट लघुपट : नॉक्टरनल बर्गर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रीमा माया (नॉक्टरनल बर्गर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : संजय मिश्रा (गिद्ध - द स्कॅव्हेंजर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिलो सुंका (नॉक्टरनल बर्गर)

सर्वोत्कृष्ट लेखन : अशोक सांखला आणि मनीष सैनी (गिद्ध - द स्कॅव्हेंजर)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जिग्मेट वांगचुक (लास्ट डेज ऑफ समर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

Ganesh Visarjan 2025 : बाप्पाला काढ ना पप्पा, तो पाण्यात बुडतोय; गणरायाला निरोप देताना कोल्हापुरातील चिमुकला भावूक; पाहा VIDEO

Latest Maharashtra News Updates : विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक सुरु

Man Kills Close Friend : जिवलग मित्राचा खून केला अन् रक्ताने माखलेला शर्ट फेकला ओढ्यात, पोलिसांना एक धागा सापडला अन्

SCROLL FOR NEXT