Anime Awards 2024 Full List eSakal
मनोरंजन

Anime Awards 2024 : 'जुजुत्सु काईसेन'ने गाजवला क्रंचीरोल अ‍ॅनिमे अवॉर्ड सोहळा; 'वन पीस' अन् 'डीमन स्लेयर'ला किती पुरस्कार?

Anime of the year : यावर्षीचा बेस्ट अ‍ॅनिमे पुरस्कार हा 'जुजुत्सु काईसेन' (सीझन 2) या अ‍ॅनिमेला मिळाला. यासोबतच तब्बल 11 कॅटेगरींमध्ये या सीरीजने पुरस्कार पटकावला आहे.

Sudesh

Crunchyroll Anime Awards 2024 Best Anime : टोकियोमध्ये शनिवारी (2 मार्च) आठवा क्रंचीरोल अ‍ॅनिमे पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. यावेळी ग्रॅमी पुरस्कार विजेती मेगन स्टॅलिन हिने 'अ‍ॅनिमे ऑफ दि इयर' पुरस्कार सादर केला. यावर्षीचा बेस्ट अ‍ॅनिमे पुरस्कार हा 'जुजुत्सु काईसेन' (सीझन 2) या अ‍ॅनिमेला मिळाला. यासोबतच तब्बल 11 कॅटेगरींमध्ये या सीरीजने पुरस्कार पटकावला आहे. (Anime of the year)

जुजुत्सु काईसेनला बेस्ट डिरेक्टर (शोता गोशोझोनो), बेस्ट अ‍ॅक्शन, बेस्ट कॅरेक्टर डिझाईन, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट एंडिंग अँड ओपनिंग सीक्वेन्सेस, बेस्ट सपोर्टिंग कॅरेक्टर (सातोरु गोजो) आणि तीन व्हॉइस अ‍ॅक्टर अवॉर्ड मिळाले. (Jujutsu Kaisen Awards)

'वन पीस' अन् डीमन स्लेयर

या सोहळ्यामध्ये One Piece या अ‍ॅनिमेला बेस्ट कंटिन्यूइंग सीरीज हा पुरस्कार मिळाला. यासोबतच बेस्ट मेन कॅरेक्टर हा पुरस्कार देखील वन पीसच्या Monkey D. Luffy ला मिळाला. डीमन स्लेयर, म्हणजेच Kimetsu No Yaiba या अ‍ॅनिमेच्या स्वॉर्डस्मिथ व्हिलेज आर्कला बेस्ट फॅन्टसी, बेस्ट आर्ट डिरेक्शन आणि बेस्ट अ‍ॅनिमेशन हे पुरस्कार मिळाले.

पुरस्कारांची संपूर्ण यादी

  • बेस्ट अ‍ॅनिमे साँग - आयडॉल (Oshi no Ko)

  • बेस्ट कॉमेडी - स्पाय फॅमिली सीझन 1 कोअर 2 (Spy X Family)

  • बेस्ट ड्रामा - अटॅक ऑन टायटन (Attack on Titan)

  • बेस्ट फिल्म - सुझुमे (Suzume)

  • बेस्ट न्यू सीरीज - चेनसॉ मॅन (Chainsaw Man)

  • बेस्ट ओरिजिनल अ‍ॅनिमे - बडी डॅडीज (Buddy Daddies)

  • बेस्ट रोमान्स - होरिमिया दि मिसिंग पीसेस (Horimiya)

  • बेस्ट स्कोअर - अटॅक ऑन टायटन (Attack on Titan)

  • 'मस्ट प्रोटेक्ट अ‍ॅट ऑल कॉस्ट' कॅरेक्टर - आन्या फोर्जर (Anya Forger)

क्रंचीरोल (Crunchyroll) ही अमेरिकेतील सोनी पिक्चर्स आणि जपानमधील अ‍ॅनिप्लेक्स या दोन्ही कंपन्यांमधील एक जॉइंट व्हेंचर आहे. अ‍ॅनिमे कंटेंटसाठी जागतिक स्तरावर एक मोठा प्लॅटफॉर्म असलेलं क्रंचीरोल आता भारतातही भरपूर लोकप्रिय होत आहे. क्रंचीरोलने कित्येक अ‍ॅनिमे सीरीज हिंदीमध्येही लाँच केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT