culture of maharashtra lavani showcased in itb berlin festival in germany sakal
मनोरंजन

जर्मनीतील 'आयटीबी बर्लिन' महोत्सवात घुमला लावणीचा ठसका! सोबत..

'बर्लिन' महोत्सवात महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन..

नीलेश अडसूळ

itb berlin festival in germany: दरवर्षीप्रमाणे यंदाही जर्मनीत ‘आयटीबी बर्लिन २०२३’ तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी प्रतिष्ठित ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला होता.

यावर्षी ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली.

(culture of maharashtra lavani showcased in itb berlin festival in germany)

यावर्षी आयटीबी बर्लिन ‘एमटीडीसी’ चा ‘महाराष्ट्र पर्यटन स्टॉल’ संपूर्ण आयटीबीचा केंद्रबिंदू राहिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यात महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्यप्रकार, लावणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. अभिनेत्री लावणीसम्राज्ञी करिश्मा वाबळे हिने आपल्या धमाल लावणी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे आयोजन स्टारक्राफ्ट एंटरटेनमेंट प्रा.लि. चे संचालक श्री संतोष मिजगर यांनी केले होते. या कार्यक्रमात बॉलीवूड पार्क, वीणा वर्ल्ड, स्वदेश ट्रॅव्हल्स, कॅप्टन नीलेश गायकवाड, डेक्कन ओडिसी, गोवर्धन इको व्हिलेज हे सह-प्रदर्शक म्हणून सहभागी झाले होते.

आयटीबी बर्लिन 2023 या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री करिश्मा वाबळे हिने आपल्या लावणीचा ठसका दाखवला. तिची दमदार लावणी पाहून सगळेच भारावून गेले. करिश्माने सोशल मीडियावर जर्मनीमधील काही फोटो देखील शेअर केले आहेत. करिश्मा एक उत्तम डान्सर असून ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT