salman khan's dabang 3 teaser is out
salman khan's dabang 3 teaser is out  
मनोरंजन

चुलबुल पांडेचा पहिला लुक प्रदर्शित, पाहा 'दबंग 3' चा टिझर

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या केवळ नावावर चाहते त्याचे चित्रपट बघायला जातात. भाईजानची फॅन फोलोइंग इतकी जास्त आहे की त्याचा नवीव चित्रपट चाहते डोक्यावर घेतात. 'भारत' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रॉबिनहूड पांडे बॉक्सऑफिसवर येण्याच सज्ज झाला आहे. सलमानचा बहुप्रक्षेपीत चित्रपट दबंग 3 चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चुलबुल पांडेची जबरदस्त अंदाजात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे.

ट्विटरवर सलमानने सिनेमाचा टिझर शेअर केला असून ट्विट करताना लिहिलं आहे की,'हॅलो ! माझं नाव आहे चुलबुल पांडे. तुम्हाला भेटून आनंद झाला'. चुलबुल पांडेच्या अवतारातला हा टिझर सध्या सोळन मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये सलमानची स्टाइल आणि अंदाज एकदम हटक़े दिसत आहे. सलमान एका डायलॉगमध्ये म्हणतो,' पिक्चर हमारी, पोस्टर हमारा तो फिल्म का प्रमोशन भी हम ही करेंगे.' दबंग 3 चा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्याला 38 हजारांपेक्षा जास्त व्हुयज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज झाला होता. सलमानने या सिनेमाच्या अॅक्शनसाठी खास मेहनत घेतली आहे. एवढचं नाही तर फायटिंग सिनसाठी त्याने स्वत: खूप काम केलं आहे. 

सलमान सोबत मुख्य भूमिकेत सोनाक्षी सिन्हा आणि किच्चा सुदीप दिसणार आहे. हा सलमानचा पहिला चित्रपट आहे जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे ज्याचं निर्देशन प्रभुदेवा करत आहे. सलमान आणि प्रभुदेवा 'वॉंटेड' या चित्रपटानंतर एकत्र काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचं निर्देशन सलमान खान, अरबाज खान आणि निखिल अडवाणी यांनी केलं आहे. हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT