Sai Tamhankar esakal
मनोरंजन

Sai Tamhankar: ओटीटीवर सईचा दबदबा; 'भक्षक'नंतर आता "डब्बा कार्टेल" मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sai Tamhankar: 'डब्बा कार्टेल' (Dabba Cartel) असं या आगामी वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर काम करणार आहे.

priyanka kulkarni

Sai Tamhankar: अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन येत आहेत. 'डब्बा कार्टेल' (Dabba Cartel) असं या आगामी वेब सीरिजचं नाव आहे. नुकताच या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'डब्बा कार्टेल' ही मल्टीस्टारर सीरिज असणार असून त्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरही (Sai Tamhankar) दिसणार आहे. या वेब सीरिजची पहिली झलक तिने सोशल मीडिया शेअर केली आहे.

डब्बा कार्टेलची कहाणी ड्रगचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची असून बॉलिवुड मधल्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, सई ताम्हणकर, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अश्या अनेक बड्या कलाकारांची फौज यात बघायला मिळणार आहे. सई आता पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातूनो ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे.

सईने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते " आता हा असा डबा आहे की त्याला तुम्ही कधी विसरू शकत नाही." दरम्यान ही सीरिज कधीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सईच्या या पोस्टवर सीरिजची निर्माती शिबानी सोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

सईने 2024 या वर्षाची सुरुवात 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटापासून सुरु केली आणि आज पुन्हा एकदा "डब्बा कार्टेल " मधून आता ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय. मराठी प्रेक्षकांना सई आकर्षित करुन घेत असताना आता बॉलिवूडमध्ये सई दमदार परफॉर्मन्स करतेय. आता ती नव्या सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यामुळे या वर्षात तिच्या चाहत्यांना आणखी किती सरप्राइज मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका होणार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात वास्तव्य करणार

Loan Relief for Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, कर्जमुक्‍तीसाठी पाच हजार कोटी; लाभ वितरण कार्यक्रमात शिंदेंच्या अनुपस्थितीची चर्चा

Farmer Loan Waiver Crises: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले; उमरखेड तालुक्यातील अंबाळी येथील घटना; सततची नापिकी, कर्जाचा डोंगर

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीमध्ये रीलसाठी गोळीबार, तरुण गंभीर जखमी

Eknath Shinde meets PM Modi: उपमुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांसह घेतली PM मोदींची भेट, काय झाली चर्चा?

SCROLL FOR NEXT