Lord Bobby Deol Best Actor  esakal
मनोरंजन

Bobby Deol : पण चर्चा 'लॉर्ड बॉबी'चीच! 'या' गोष्टीसाठी मिळाला 'दादासाहेब फाळके पुरस्कार

बॉबीला (Lord Bobby Deol Best Actor ) मोठ्या कालावधीनंतर दादासाहेब पुरस्कार मिळाल्याचे दिसून आले असून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

युगंधर ताजणे

Dadasaheb Phalke Awards 2024 : बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला असून त्यामध्ये वेगवेगळ्या सेलिब्रेटींना गौरविण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती किंग खान शाहरुख (Dadasaheb Phalke Awards 2024 News) अन् बॉबी देओलची. सोशल मीडियावर बॉबीवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

ॲनिमल या संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं (Animal Bobby Deol News) साकारलेल्या नकारात्मक भूमिकेबद्दल त्याला दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर बॉबी हा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल दीड दशकानंतर बॉबीनं बॉलीवूडमध्ये केलेलं पुनरागमन हे त्याच्या करिअरसाठी चांगलेच लाभदायी ठरताना दिसत आहे.

बॉबीनं प्रकाश झा यांच्या आश्रम नावाच्या मालिकेमध्ये निराला बाबाची (Bobby Deol Latest news) भूमिका साकारुन प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता या मालिकेचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच त्याचा प्रदर्शित झालेला ॲनिमल नावाचा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. त्यात त्यानं साकारलेली अबरारची भूमिका देखील चाहते, समीक्षक यांच्या कौतुकाचा विषय होती.

प्रसिद्ध अभिनेता रणबीरच्या तुलनेत भलेही बॉबीला स्क्रिन टाईम कमी (Animal Lord Bobby) मिळाला असेल मात्र त्यानं रणबीरला टस्सल देत आपल्या भूमिकेची वेगळी छाप उमटविल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तो प्रचंड हिट झाला. त्याच्या नावाची वेगळी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. बॉबीचा फॅनबेस मोठा आहे. अशावेळी त्याच्या फॅननं त्याची स्तुती करत त्याच्या आगामी प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अशातच आगामी काळात बॉबी देओल हा ॲनिमलच्या सिक्वेलमध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच आश्रमच्या ४ थ्या सीझनमध्येही त्याचा वेगळा परफॉर्मन्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान बॉबीला मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार त्याच्या मेहनतीला मिळालेली मोठी पोचपावती असल्याचं चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या टीव्ही सेलिब्रेटींना गौरविण्यात आले आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. याप्रसंगी शाहरुख खान, बॉबी देओल, नयनतारा, करिना कपूर खान, सुनील ग्रोव्हर, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, शाहिद कपूर, विक्रांत मेस्सी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT