dagdi chawl 2 movie trailer out with presence of real daddy arun gawli in dagadi chawl  sakal
मनोरंजन

'डॅडी' उर्फ अरुण गवळी यांच्या हस्ते 'दगडी चाळ २'चा ट्रेलर आउट..

अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

नीलेश अडसूळ

daagdi chaawl : मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

(dagdi chawl 2 movie trailer out with presence of real daddy arun gawli in dagadi chawl)

'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे चित्रपटाबद्दल म्हणतात की, "मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ २' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘’ प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे. लवकरच ‘दगडी चाळ २’ आपल्या भेटीला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानी यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT