Dananeer Mobeen Latest News Dananeer Mobeen Latest News
मनोरंजन

Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्...

दनानीरने घरगुती लिपबाम तयार केला आहे

सकाळ डिजिटल टीम

Dananeer Mobeen Latest News सोशल मीडियावर कधी कोण स्टार बनेल सांगता येत नाही. यासाठी केवळ एक व्हिडिओही पुरेसा असतो. व्हायरल व्हिडिओ (Viral Video) एखाद्याला काही मिनिटांतच जगभरात प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो. यापैकीच एक दनानीर मुबीन (Dananeer Mobeen). साधारण दोन वर्षांपूर्वी दनानीर मुबीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून पाकिस्तानची (Pakistan) डिजिटल क्रिएटर दनानीर मुबीन ही पावरी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. याच पावरी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे तिला ट्रोल देखील व्हावं लागत आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी दनानीरने (Dananeer Mobeen) मित्रांसोबत एक व्हिडिओ (Viral Video) बनवला होता. तिचा हा पावरी व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला होता. ‘पावरी हो रही है’ म्हणत त्यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता दनानीरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने ओठ मोठे दिसण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील हे सांगितले आहे.

दनानीरने घरगुती लिपबाम तयार केला आहे. यासाठी तिने आधी वॅसलीन घेतले. त्यात थोडीशी मिरची पूड टाकली आणि थोडी दालचिनी पावडर टाकली. सगळं एकत्र करून हे मिश्रण तिने ओठांना लावले. हे मिश्रण किमान पाच मिनिटं ठेवावे असे ती सांगत आहे. मात्र, हा खतरनाक लेप तिलाही सहन झाला नाही. ओठांची जळजळ होत असल्याचे तिने सांगितले. पाच मिनिटांच्या आतच तिने लेप पुसून टाकला.

दनानीर चांगलीच घामाघूम झाली

मिरची पूड लावल्याने दनानीर चांगलीच घामाघूम झाली. अखेर तिने हा घरगुती उपाय न करण्याचा सल्ला दिला आहे. ओठ मोठे दिसण्यासाठी ही ट्रिक अजिबात करू नका असे तिने सांगितले. यामुळे ओठ मोठे होत असले तरी ओठांची प्रचंड जळजळ होते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले ‘मी घरच्या घरी बनवलेले हे लिप प्लंपर ट्राय केले. मात्र, हे लक्षात आले की ओठ मुळातच खूप सुंदर आहेत. मात्र, हे खूपच वेदनादायक असल्यामुळे घरी अजिबात ट्राय करू नका.’

दनानीरला अनेकांनी केले ट्रोल

या व्हिडिओवर कमेंट करीत दनानीरला अनेकांनी ट्रोल केले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माथिराने कमेंटमध्ये लिहिले, ‘कुणी ओठांना मिरची पूड लावण्याचा सल्ला कस काय देऊ शकते. गुगलवरील प्रत्येक गोष्ट योग्य असतेच असे नाही.’ अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी हे खतरनाक असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT