biki das  Team esakal
मनोरंजन

डान्स इंडिया डान्सचा स्पर्धक बिकी दासचा अपघात

तो गेल्या काही दिवसांपासून डिलिव्हरी बॉयची नोकरी करत होता.

युगंधर ताजणे

मुंबई - डान्स इंडिया डान्सच्या सीझन 4 (dance india dance season 4 ) चा लोकप्रिय स्पर्धक बिकी दासचा (Biki das) अपघात झाला आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे त्यानं पर्यायी काम म्हणून डिलीव्हरी बॉयचा जॉब सुरु केला होता. त्या दरम्यानचा त्याचा अपघात (road accident) झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. एका दुचाकीस्वारानं त्याला धडक दिली आहे. त्यामुळे बिकीला गंभीर दुखापत झाली आहे. (dance india dance season 4 contestant biki das was injured in a road accident as he was working as food delivery guy)

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार बिकीच्या (wife of biki das) पत्नीनं अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बिकीला दिलेली धडक एवढी जोरात होती की त्यात त्याच्या पाठीला मोठी दुखापत झाली आहे. बिकी 2014 मध्ये डान्स इंडिया डान्समध्ये दिसला होता. तो त्या शो चा सेकंड रनर (second runner up) अप होता. त्यानं आपल्या डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

त्यावेळी त्या शो चे विजेतेपद श्याम यादवनं (sham yadav) पटकावलं होतं. ही स्पर्धा संपल्यावर बिकीनं काही खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स करायला सुरुवात केली होती. तसेच काही स्पर्धांसाठी त्यानं मेंटॉरचीही भूमिका केली होती. मात्र कोरोनामुळे त्याला ते काम सोडावे लागले. आणि त्याच्यापुढे आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं. याकाळात त्यानं डिलिव्हरी बॉयचे काम सुरु केले.

कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यात काही दिग्गज सेलिब्रेटींचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. कोरोनानं अनेक मालिका आणि चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राची धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT