vridhi 
मनोरंजन

तमिळ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; पाहा VIDEO

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - हिंदी चित्रपटांसह दाक्षिणात्य चित्रपटांचाही चाहता वर्ग मोठा आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची , गाण्यांची भाषा समजत नसली तरी त्यातली दृष्ये मनाला भावतात, कथा दृश्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते तर संगीताच्या तालावर चाहते ठेका धरतात. यात कुठेच भाषेची अडचण येत नाही. गेल्या महिन्याभरात याचा प्रत्यय येणारे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यात मंगली या गायिकेनं गायलेल्या तेलुगु गाण्याचा आणि एका वृद्धी नावाच्या चिमुकलीचा डान्स करणारा व्हिडीओ आहे. दोघींच्याही व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यावर ​​चिमुकल्या वृद्धीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतोय. 

मंजिल विरिंजा पोवू या सिरीयलधील अभिनेता अखिल आनंदच्या लग्नाच्या रिसेप्शमधला हा व्हिडीओ आहे. वृध्दीने प्रसिध्द अभिनेता अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय ‘Ravuloo’ या गाण्यावर डान्स केला. वृध्दी अल्लू अर्जूनची चाहती असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे.

वृद्धीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती अभिनेता विजयच्या 'वाथी कमिंग' या  तामिळ गाण्यावर डान्स करत आहे. सोशल मिडीयावर अभिनेता विजय आणि अल्लू अर्जूनच्या डान्स व्हिडिओसोबत वृद्धीच्या डान्सचे व्हिडीओ एडीट करून शेअर केले जात आहेत. वृद्धी या दोघांच्याही डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसते. क्यूट अशा वृद्धीच्या या डान्सचं कौतुक होत आहे. 

वृद्धी 5 वर्षांची आहे. तिने 'मंजिल विरिंजा पोवू' या सिरीयल मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या सिरीयलमध्ये अनुमोल नावाच्या मुलीची भूमिका वृध्दी करते. सिरीयलसोबतच वृद्धीला चित्रपटांच्याही ऑफर येत असतात. वृद्धीचे सोशल मिडीया अकाउंटवर तिचे फोटो आणि व्हिडीओ तिचे शेअर करतात. वृद्धीचे आई वडिल विशाल कन्नन आणि गायत्री हे प्रोफेशनल डान्सर आहे. या डान्सच्या व्हिडीओमुळे वृध्दीला कमी वयात जास्त लोकप्रिता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT