Mukti Mohan-Kunal Thakur wedding photos  Esakal
मनोरंजन

Kunal- Mukti Mohan wedding: 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्यासोबत डान्सर अन् अभिनेत्री मुक्ती मोहनने बांधली लग्नगाठ!

मुक्ती मोहनने तिचा प्रियकर कुणाल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली.

Vaishali Patil

Mukti Mohan-Kunal Thakur wedding photos: बॉलिवूडची सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री मुक्ती मोहन ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. मुक्ती मोहनने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची शेअर केली आहे.

मुक्ती मोहनने तिचा प्रियकर कुणाल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली. सध्या या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात मुक्ती खूपच सुंदर दिसत आहे.

मुक्ती अनेकदा तिच्या नृत्य आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर तिने कुणालसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर तिचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लग्नाचे फोटो शेअर करत मुक्तीने लिहिले, “त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।” मला तुझ्यात माझे दैवी नाते दिसते.

तुझी माझी भेट नशिबाने केली आहे. देव, कुटुंब आणि मित्र यांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञ. आमचे कुटुंब आनंदी आहे आणि आम्ही पती-पत्नी म्हणून आमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेत आहोत.'

यात तिने पुढे लिहिले, कुणालला मुक्ती मिळाली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आह.

मुक्ती-कुणालची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. तिने यात तिच्या कुटुंबासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

मुक्ती मोहनचा पती कुणाल ठाकूर हा अभिनेता आहे. कुणाल इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर तो लोकप्रिय आहे. तो नुकताच अॅनिमल चित्रपटात रश्मिकाच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT