Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'मुलीचं कर्तव्य काय असतं हे...', बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर अखेर गौतमी पाटीलने स्विकारली वडिलांची जबाबदारी

गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, 'मरणासन्न' अवस्थेत आढळले

अंकिता खाणे (Ankita Khane)

आपल्या नृत्याच्या माध्यमातून राज्याला परिचित आणि तरुणाईमध्ये क्रेझ असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, मरणासन्नावस्थेत आढळले. त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. चव्हाण यांना संबंधित रुग्ण कोण हे माहीत नव्हते. त्यांनी रुग्णाच्या आधारकार्डव्दाद्वारे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यावर ओळख पटू शकली. (dancer gautami patil father found in dhule news)

वडिलांची बातमी गौतमी पर्यंत पोहोचल्यानंतर तिने वडिलांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गौतमी पाटीलच्या वडिलांना आता उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे. गौतमीने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपण वडिलांच्या उपचारासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील हे धुळ्यात मरणासन्नावस्थेत आढळले होते. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. खिशात असलेल्या आधार कार्डवरुन ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं होते.

यासंबधीच्या बातम्या समोर आल्यानंतर आपले वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून प्रकृती गंभीर असल्याचे कळताच गौतमी हिने धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला व त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले होते.

त्यानंतर गौतमीने पुढाकार घेत वडिलांच्या पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावरील उपचार स्वतःच्या देखरेखीत व स्वखर्चाने पुण्यात करणार असल्याचे गौतमीनं स्पष्ट केलं आहे. गौतमी लहानाची मोठी तिच्या मामांकडे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT