Brooklyn Beckham
Brooklyn Beckham esakal
मनोरंजन

Nicola Peltz: पोराच्या लग्नासाठी वाट्टेल ते! 26 कोटींचा केला खर्च

युगंधर ताजणे

entertainment news: फुटबॉल जगतामध्ये प्रख्यात असणाऱ्या डेव्हिड बॅकहॅमच्या (David Beckham Son) मुलाच्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. ब्रुकलीन बेकहॅम (Brooklyn Beckham) असं त्याचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये (Hollywood News) त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. त्यानं निकोला पेल्टजसोबत लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. निकोलाविषयी सांगायचे झाल्यास ती हॉलीवूडची अभिनेत्री आणि (social media viral news) अरबपतीची मुलगी आहे. त्यामुळे ब्रुकलीन आणि तिच्या लग्नात पैशांची नुसती उधळपट्टी करण्यात आली. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन डेव्हिड बेकहॅमच्या चाहत्यांनी ब्रुकलीनला शुभेच्छाही दिल्या आहेत.

निकोला आणि ब्रुकलीनच्या लग्नात एकुण 26.56 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या लग्नाची चर्चा झाली नसती तर नवल म्हणावं लागलं असतं. डेव्हिडची सुनबाईच्या लग्नानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता आपण ही निकोला कोण आहे हे जाणून घेणार आहोत. निकोली (Nicola Peltz) ही हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं ट्रान्सफॉर्मर्सच्या दोन पार्टमध्ये काम केले आहे. चाहत्यांना तिची भूमिका कमालीची आवडली असून ती सध्याच्या घडीला हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री झाली आहे. दुसरीकडे फुटबॉलच्या दुनियेत आपल्या खेळानं चाहत्यांची पसंती मिळवणारा खेळाडू म्हणून डेव्हिड बेकहॅमला सारं जग ओळखतं. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. आता त्याच्या मुलाचं लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच. त्याची सुन निकोला पेल्टज ही एका अरबपतीची मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला तब्बल 3.5 मिलियन डॉलर म्हणजे 26.56 कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

निकोला आणि ब्रुकलीनचं फ्लोरिडा जवळील पाम बीचवर ग्रँड सेलिब्रेशनमध्ये विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी हॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यात पॅरिस हिल्टन पासून सेरेना व्हिल्यम्स पर्यत अनेक व्यक्तिंचा समावेश होता. निकोलाच्या लग्नातील सजावटही मोठी आकर्षक असल्याचे दिसून आले आहे. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाविषयी आणखी एक महत्वाची बातमी द्यायची झाल्यास, ब्रुकलीनचं वय केवळ 23 वर्षे आहे. तर निकोला ही 27 वर्षांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT