Dayaben Back In action in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Google
मनोरंजन

Taarak Mehta: आता लवकरच ऐकायला मिळणार "हे मा माताजी"- दया येणार परत...

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनच्या परतीसाठी जेठालाल उपोषण करणार,खाणे पिणे सोडून देणार अशी जोरदार हवा सध्या पसरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मा म्हटले की जेठा आणि दयाची वेगळी जोडी समोर येतेच,इंग्लीश बदल दोघांच्या आत्मविश्वासाची मजा किंवा दोघांची भांडणे.पण दयाबेन गेल्या ५ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधून अनुपस्थित आहे. आता बातमी अशी आहे की दयाबेन लवकरच परतणार आहे कारण जेठालालने त्यांना परत आणण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी त्यांनी एक कल्पना सुचली आहे.(Dayaben Back In action in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेन अहमदाबादमध्ये बसली आहे आणि अशा प्रकारे ठाण मांडून बसली आहे की ती परत येण्याचे नाव घेत नाही. तिला परत आणण्यासाठी लाखो प्रयत्न झाले पण यावेळी ती परतण्याच्या मन:स्थितीत नाही. शोचे प्रेक्षक यामुळे निराश झाले आहेत, पण गोकुलधाममध्ये दयाबेनच्या अनुपस्थितीचा सर्वात जास्त परिणाम जेठालाल यांच्यावर झाला आहे. भाऊ... दयाबेनच्या जाण्याने त्यांचे जग उजाड झाले आहे. पण आता जेठालालने आपली दया परत आणण्याचा निर्धार केला आहे.

जेठालाल दयेसाठी उपोषण करणार आहे

होय...खर आहे दयाबेनला आणण्यासाठी जेठालालकडे पर्याय उरला नसल्याची बातमी आहे. त्यामुळे आता तो असे पाऊल उचलणार आहे की त्यामुळे दयाबेनला गोकुळधाम सोसायटीत यावंच लागेल. दयासाठी जेठालाल आता उपोषणाला बसणार आहेत. अलीकडेच, शोचे निर्माते असित मोदी यांनी खुद्द खुलासा केला की, जेठालाल दयाबेनला परत आणण्यासाठी खाणेपिणे देखील सोडणार आहेत, त्यानंतर दया यांना परत यावेच लागेल.

त्यामुळे आता निर्माते बोलले आहेत म्हणजे दयाबेनचे पुनरागमन लवकरच होणार हे निश्चितच झाले आहे जवळ-जवळ आणि आता लवकरच 'टप्पु के पापा' ही हाक आपल्यालाही ऐकायला मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Tourism: मध्य प्रदेश फिरायला जाणार असाल तर ही बातमी महत्त्वाची; पर्यटन क्षेत्रात होणार मोठे बदल; होमस्टे, जंगल सफारी आणि बरंच काही..

SCROLL FOR NEXT