dcm devendra fadnavis warm hug to actor bhau kadam at function  SAKAL
मनोरंजन

Bhau Kadam - Devendra Fadanvis: आणि फडणवीसांनी भाऊंना कडकडून मिठी मारली, व्हिडीओ व्हायरल

भाऊ कदम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल होतोय

Devendra Jadhav

Bhau Kadam - Devendra Fadanvis Video Viral: भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. भाऊ कदम यांना आपण चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून विविध विनोदी भूमिका करताना पाहिलंय.

भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्याच नाही तर विविध सिनेमांमधून आणि नाटकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलंय.

भाऊंचे अनेक राजकारणी व्यक्तींशी चांगले संबंध आहेत. अशातच भाऊ कदम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात देवेंद्र फडणवीसांनी भाऊंना कडकडून मिठी मारलेली दिसतेय.

आणि फडणवीसांनी भाऊंना मारली मिठी...

भाऊ कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात भाऊंनी एका सोहळ्याला हजेरी लावली आहे. तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेकर दिसत आहेत.

भाऊंना पाहताच फडणवीसांनी अरे भाऊ म्हणत त्यांना मिठी मारली. पुढे त्यांच्यासोबत फडणवीसांनी फोटोशूट केलं. जाताना "काय भाऊ कसे आहात?" म्हणत फडणवीसांनी भाऊंची विचारपूस केली.

भाऊ कदम यांचं वर्कफ्रंट

भाऊ कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ते गेली अनेक वर्ष चला हवा येऊ द्या या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. भाऊ कदम अनेक गाजलेल्या सिनेमांमधील भूमिका चला हवा येऊ द्या मध्ये साकारत असतात.

सध्या भाऊ कदम महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेसोबत करुन गेलो गाव या नाटकात अभिनय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT