Mahesh Manjrekar News
Mahesh Manjrekar News esakal
मनोरंजन

Mahesh Manjrekar: 'KGF 2 पाहिल्यावर तुम्हाला उठून जावसं वाटलं नाही का?' इतका वाईट...

युगंधर ताजणे

Mahesh Manjrekar Movie: हिंदी - मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांचा दे धक्का आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2008 मध्ये त्यांचा दे धक्काचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल 14 (Marathi Movie news) वर्षांनी दे धक्काचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या निमित्तानं दे धक्काच्या टीमशी संवाद साधला. यावेळी मांजरेकर यांनी आपल्या (De Dhakka Movie) नेहमीच्या शैलीत टॉलीवूड, मॉलीवूड आणि बॉलीवूड यांचा आढावा घेतला. मराठी चित्रपट चालण्यासाठी त्याला अच्छे दिन येण्यासाठी काय करावे लागेल याविषयी देखील त्यांनी आपली मतं मांडली.

प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी यावं. याचे कारण म्हणजे मल्याळम चित्रपटानंतर मोठं मनोरंजन जर कुणी देत असेल तर ते मराठी सिनेमा. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. पण मल्याळम सिनेमाला जसा सपोर्ट आहे तसा आपल्याला नाही. त्याचं होतं की, जशी प्रेक्षकसंख्या वाढते तशी त्याचे विभाजन व्हायला लागते. ओटीटीवर त्या कलाकृतीचे रेट वाढतात. मराठी चित्रपटाला ओटीटीवर हिट नाही. कारण चित्रपट लोकप्रिय असेल तर त्याला हिट मिळतात.

मला बरेचसे असे नॉन मराठी प्रेक्षक भेटतात की ज्यांनी नटसम्राट पाहिला आहे. अर्थात त्यांनी तो ओटीटीवर पाहिला आहे. पण हा जो एक फरक आहे तो मराठी प्रेक्षकांमध्ये जाणवत नाही. नॅशनल अॅवॉर्डमध्ये दरवर्षी मराठी चित्रपटाला एक तरी पुरस्कार मिळताना दिसतो. मराठी झेंडा त्यानिमित्तानं आपल्याला रोवताना दिसतो. तिकडे कन्नडमध्ये एक ओरड होती ती म्हणजे त्यांच्याकडे सगळे तेलुगू आणि तमिळ चित्रपट पाहिले जात होते. त्यानंतर कन्नडमध्ये एकाला केजीएफन नावाचा चित्रपट बनवासा वाटला. आणि त्याला मोठं यश मिळालं. मला तो चित्रपच काही आवडला नाही.

केजीएफच्या दुसऱ्या चित्रपटानं तर हिंदी चित्रपटांना मागे टाकलं होतं. हिंदीत डब करुन केजीएफ आपल्यासमोर आला होता. आपल्या भाषेबद्दलचा गर्व जोपर्यत आपल्यात येणार नाही तोपर्यत मराठी चित्रपटांना चांगले दिवस येणार नाही. तो अभिमान तमिळ, तेलुगू आणि तमिळ यांच्यात आहे तसा तो आपल्यात यायला हवा. मी असं म्हणत नाही की हिंदी चित्रपट पाहू नका. पण चांगले मराठी चित्रपट नक्की पाहायला जा. यावेळी मांजरेकर यांनी अनन्या आणि त्यांच्या पांघरुण चित्रपटाचे उदाहरणही दिले.

केजीएफला एवढा प्रतिसाद का मिळाला हे मला अजुनही कळालेलं नाही. त्यातील दहा टक्के प्रेक्षक जरी मराठी चित्रपटांना मिळाला तरी मराठी चित्रपट चांगले चालतील. युवकांना तो चित्रपट आवडला. पण मग आपले चित्रपटात देखील त्याच गोष्टी असतील तरी त्या का आवडत नाही, असा सवाल मांजरेकर यांनी उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT