Debina Bonnerjee Ramp Walk: Esakal
मनोरंजन

Debina Bonnerjee: देबिनाचा लेकींसोबत रॅम्प वॉक! मुलींच्या क्यूटनेसवर नेटकरी फिदा, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Debina Bonnerjee Ramp Walk: देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे कपल टिव्ही विश्वातील लोकप्रिय कपल आहे. नेटकऱ्यांना ही दोघांची जोडी खुप आवडते.

सध्या हे कपल त्यांच्या दोन गोंडस मुलींमुळे चर्चेत आले आहेत. आई झाल्यानंतर देबिना जरी मनोरंजन क्षेत्रातून दुर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत फोटो शेयर करत असते.

सध्या सोशल मिडियावर देबिना आणि तिच्या लेकींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात देबिना दोन्ही मुलींसोबत रॅम्प वॉक करताना दिसली.

देबिनाचा तिच्या मुलींसोबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिचा पती गुरमीत चौधरीही दिसत आहे. काल बॉम्बे फॅशन वीकसाठी देबिनाने रॅम्प वॉक केला.

देबिनाने हा व्हिडिओ तिच्या सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. यावेळी आई आणि दोन्ही मुलींनी ट्यूनिंग केली होती. यावेळी देबिनाने मरून आणि केशरी रंगाचा राफेल ड्रेस परिधान केला होता. एवढेच नाही तर तिच्या दोन्ही मुलींनीही मॅचिंग आउटफिट घातले होते

व्हिडिओमध्ये दिसते की, देबिना आपल्या मुलीचा हात धरून स्टेजवर येते. तिने दुसऱ्या लहान मुलीला उचलले दिसत आहे. रॅम्पवर येताच देबिना पहिले गुरमीतकडे गेली, जिथे गुरमीतनेही तिच्यावर आणि दोन्ही मुलींवर प्रेमाचा वर्षाव केला.

यानंतर आणखी काही व्हिडिओत रॅम्प वॉक नंतर देबिनाने आपल्या मुलींसोबत डान्स केला. या व्हायरल व्हिडिओत देबिना आणि तिच्या मुलींवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

देबिनाने IVF च्या माध्यमातून मुलींना जन्म दिला आहे. तिच्या मोठ्या मुलीचे नाव लियाना आहे, तर लहान मुलीचे नाव दिविशा आहे. देबिना बॅनर्जी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे फॅन फॉलोइंग मजबूत आहे. देबिना तिच्या यूट्यूब ब्लॉगद्वारे चाहत्यांसोबत जोडलेली असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

SCROLL FOR NEXT