Dipak Tijori Allegation on Mohit Suri Mahesh Bhatt  esakal
मनोरंजन

Deepak Tijori : 'माझीच संकल्पना चोरून...', प्रसिद्ध फिल्ममेकर मोहित सूरीवर अभिनेता दीपक तिजोरीनं केला चोरीचा आरोप

प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी हा त्याच्या हटक्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Dipak Tijori Allegation on Mohit Suri Mahesh Bhatt : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी हा त्याच्या हटक्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. ज्यांनी आमिर खानचा जो जिता वही सिकंदर पाहिला असेल त्यांना दीपक तिजोरी कोण हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता दीपक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दीपक हा बॉलीवूडपासून लांब राहिला आहे. त्यानं जाणीवपूर्वक आपण या क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला हे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. दरम्यानच्या काळात त्यानं काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. त्यांच्या निर्मितीप्रक्रियेत भागही घेतला. जो जिता वही सिकंदरच नव्हे तर कभी हा कभी ना आणि दिल है की मानता नही मध्ये देखील दीपक चमकला होता. Deepak Tijori Alligation on Mohit Suri

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan

दीपकच्या वाट्याला नेहमीच दुय्यम भूमिका आल्या. मात्र त्या भूमिकांचे त्यानं सोने केले. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या आवडीचा अभिनेता राहिला. आता त्यानं १८ वर्षानंतर एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामध्ये तो प्रसिद्ध फिल्ममेकर मोहित सुरीवर आरोप करताना दिसतो आहे. त्यानं जहर नावाच्या चित्रपटावरुन खुलासा केला आहे. दीपकनं बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या गोष्टीविषयी सांगितले आहे.

दीपक म्हणतो की, मला मोहित सुरीनं धोका दिला. मी दिग्दर्शक महेश भट्ट यांना माझ्या एका चित्रपटाची आयडिया सांगितली होती. मात्र ही आयडिया पुढे मोहित सुरीनं चोरून त्यावरुन जहर नावाचा चित्रपट तयार केला. ज्यात इम्रान हाश्मी, उदिता गोस्वामी आणि शमिता शेट्टी यांच्या भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट लोकप्रिय झाला होता.

दीपक तिजोरीनं पुढं सांगितलं की, मी महेश भट्ट यांच्यासोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. त्यांनी जेव्हा माझ्याकडून जहरची स्टोरी ऐकली तेव्हा ते खुश झाले नाहीत. या कथेमध्ये काही दम नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्या चित्रपटाची मुळ आय़डिया ही डेंझल वॉशिंग्टन याची भूमिका असलेल्या ऑऊट ऑफ टाईमचा अनऑफिशियलच्या रिमेकची होती.

मला धक्का तेव्हा बसला की, जेव्हा मी महेश भट्ट यांच्या ऑफिमधून बाहेर पडलो आणि मला मोहित सुरी भेटला. तो मला म्हणाला की, तुझे काही म्हणणे असेल तर तू महेश भट्ट यांच्याशी बोल. हे ऐकून मला मोठा धक्काच बसला. चार दिवसानंतर मी जेव्हा अनुराग बसू यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांना माझी आयडिया सांगितली. त्यांना ती आवडली. ते मला म्हणाले की, यावर महेश भट्ट चित्रपट तयार करत असून ते मोहित सुरीला लाँच करत आहेत. असे दीपकनं त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT