Deepika Padukone
Deepika Padukone esakal
मनोरंजन

'डुबे'मध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज! 'गेहरांईया'चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)यांच्या आगामी 'गेहरांईया' (Gehraiyaan) या चित्रपटातील पहिले गाणे 'डूबे' (Doobey) रिलीज झाले आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर याची क्लिप अपलोड केली आहे. संपूर्ण गाण्यात दोघांमध्ये अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. या गाण्यात दीपिका आणि सिद्धांतच्या केमिस्ट्रीला नेटीझन्सकडून पसंदी मिळत आहे.त्याचबरोबर निगेटिव्ह कमेंटही येत आहेत.

रणवीर सिंहसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच इतक्या बोल्ड भूमिकेत दिसली आहे. यापूर्वी ‘राम लीला’मध्ये रणवीरसोबतचा तिचा किसिंग सीन चर्चेत होता. त्यानंतर आता ‘डुबे' या गाण्यात दीपिकाचा सिद्धांत सोबत बोल्ड लुक आणि किसिंग सीन चर्चेत येत आहे.

गेहरांईया हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर याची 30 सेकंदांची क्लिप अपलोड केली आहे. 'डूबे' या संपूर्ण गाण्यात 5 किसिंग सीन आहेत. लग्नानंतर बोल्डनेस सीन्स देण्यावरुन चाहते नाखूष झाले आहेत.

'गेहराईयाँ' या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. दीपिका, सिद्धांत, अनन्या यांच्यासोबतच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT