Deepika Padukon: Deepika's relationship mocked, fans demand action, watch video 
मनोरंजन

Deepika Padukon: दीपिकाच्या रिलेशनशीपची उडवली खिल्ली, चाहत्यांची कारवाईची मागणी, व्हिडीओ बघा

उत्तर प्रदेशमधील एका विद्यापीठात हा संतापजनक प्रकार घडल्याचा उघडकीस आलाय

Devendra Jadhav

Deepika Padukon News: दीपिका पादुकोण ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. दीपिका गेल्या काही दिवसांपासुन तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे. दीपिका कॉफी विथ करण 8 मध्ये पती रणवीर सिंगसोबत सहभागी झाली होती.

त्यावेळी दीपिकाने अनेक विधानं केली होती. त्यामुळे दीपिकाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. पण सध्या दीपिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झालाय. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आहे. या व्हिडीओत दीपिकाच्या पास्ट रिलेशनशीपची मस्करी करण्यात आलीय. एकुणच दीपिकाचे जुने नातेसंबंध स्टँड-अप कॉमेडी अॅक्टच्या माध्यमातुन दाखवण्यात आल्याने दीपिकाच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दीपिकाचे रणबीर कपूर, युवराज सिंग, निहार पांड्या आणि सिद्धार्थ मल्ल्या यांच्यासोबतचे जे रिलेशनशीप्स होते त्याची खिल्ली उडवण्यात आलीय.

व्हिडिओच्या सुरुवातीला, एक मुलगी दीपिकाप्रमाणे वेशभुषा करुन येते. त्यानंतर दीपिकाच्या एक्स-अफेअर्सचे फोटो बॅकग्राउंडमध्ये दिसतात. महेंद्रसिंग धोनी, युवराज, रणबीर अशी पात्रे एकामागून एक नाचतात. या स्टँड अप कॉमेडीबद्दल चाहते प्रचंड संतापले आहेत.

अशाप्रकारे दीपिका पादुकोणच्या आधीच्या नातेसंबंधांची स्टॅंड अप कॉमेडी करण्यात आली. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी या व्हिडीओविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

एखाद्या अभिनेत्रीच्या नातेसंबंधांची अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.आता पोलीस संबंधितांवर कारवाई करणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT