Ranvir Singh, Deepika Padukone
Ranvir Singh, Deepika Padukone 
मनोरंजन

'दीपवीर'चे बंगळूरात ग्रँड रिसेप्शन

वृत्तसंस्था

बंगळूर : नुकतेच इटलीत विवाहबद्ध झालेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन बंगळूरमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनला अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
या दोघांचा विवाह इटलीतील लेक कोमो शहरात थाटामाटात पार पडला होता. बंगळूरमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये दीपिकाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. तर, रणवीरने शेरवाणी परिधान केला होता. सबस्याची या डिझायनरने खास त्यांच्या रिसेप्शनसाठी याचे डिझाईन बनविले होते. दीपिकाला ही साडी तिच्या आईने भेट दिली होती. दीपिकाच्या अनेक दागिनेही परिधान केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. 

दीपिका आणि रणवीर नुकतेच मुंबईत परतले होते. या दोघांचे मुंबई विमानतळावरील फोटो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नाच्या ड्रेसपासून गृहप्रवेशापर्यंत प्रत्येकाला उत्सुकता होती. इटलीत कोंकणी आणि सिंधी पद्धतीने "दीपवीर'चा विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता मुंबईतही एक जंगी रिसेप्शन पार्टी होणार आहे. त्या पार्टीत "दीपवीर' कोणत्या पेहरावात पाहायला मिळणार आणि कोणकोणते सेलिब्रेटी उपस्थित राहणार, ते पाहणं रंजक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT