Ranveer Singh and Deepika Padukone Google
मनोरंजन

दुबईत असं काय घडलं की दीपिका-रणवीरच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या...

बहुचर्चित '८३' सिनेमाच्या ट्रेलरला मिळाला बुर्ज खलिफावर झळकण्याचा मान...

प्रणाली मोरे

दोन दिवसांपूर्वी दीपिका पदूकोण(Deepika Padukone)आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) या जोडीला एकत्र एअरपोर्टवर पाहिलं गेलं. नेहमीप्रमाणेच हे लव्हबर्ड्स आपल्या हटके ड्रेसिंग स्टाईलमध्ये हातात हात घालून एअरपोर्टच्या आत जात होते. मीडियानं फोटोसाठी विचारताच नेहमीच आपल्या अतरंगी वागण्यामुळे प्रकाशझोतात येणारा रणवीर इथंही भाव खाऊन गेला. त्याला 'दीपिकासोबत फोटो दे' असं फक्त सांगण्यात आलं होतं, पण साहेबानं थेट दीपिकाच्या गालावर कीस केलं ना राव आणि मीडियाला एक रोमॅंटिक फोटो देऊन टाकला. असो,दोघे जाम खुशीत होते म्हणून मीडियाचं ऐकत होते एवढंच आता म्हणावं लागेल. कारण त्यानंतर काल एक असा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे या दोघांचं मुंबईतनं निघताना खुश असण्याचं कारण कळालं.

तर त्याचं कारण आहे बहुचर्चित इंडियन वर्ल्ड कप टीम आणि प्रामुख्यानं विनिंग टीमचे कॅप्टन कपिल देव यांच्यावर आधारित सिनेमा '८३'. कोरोनामुळे या सिनेमाला प्रदर्शनासाठी खूप वाट पहावी लागली. पण अखेर सिनेमा प्रदर्शित होतोय,आणि सिनेमाच्या प्रमोशनचाही खूप बोलबाला होतोय बरं का. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे तर दीपिका पदूकोण कपिल देव यांच्या बायकोची भूमिका साकारीत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र ऑनस्क्रीनही नवरा-बायको म्हणून वावरताना दिसणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. आता याच सिनेमाच्या ट्रेलर लॉंचसाठी हे जोडपं दुबईत गेलं होतं. त्यावेळेस असं काही घडलं की या दोघांनाही आपल्या अश्रूचे बांध आवरेनात.

तर त्याचं झालं असं की, '८३' च्या ट्रेलरला मान मिळाला तो थेट जगातील सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर झळकण्याचा. त्या देखण्या सोहळ्याला सिनेमातील सर्व कलाकारांसोबत '१९८३' च्या ख-याखु-या विनिंग टीमचे कॅप्टन कपिल देव,सुनिल गावस्कर हेही उपस्थित होते. दीपिका-रणवीर या सोहळ्याचे साक्षीदार होताना भावूक झालेले पहायला मिळाले. अर्थात आपल्या कलाकृतीसोबतच जगातल्या उंच इमारतीवर आपला चेहरा दिसणं ही सुद्धा एक स्वप्नवत घडणारीच गोष्ट आहे नाही का. या संपूर्ण सोहळ्याचा व्हिडीओ वर बातमीत जोडलेला आहे नक्की पहा. 'बुर्ज खलिफा' पाहिल्याचा आनंद अनं दीपिका-रणवीरच्या सुखानंदाचाही एक भाग होऊया की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT