Deepika Padukone And Ranveer Singh esakal
मनोरंजन

Deepika Padukone Pregnancy News: गुडन्यूज! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा, सोशल मीडियावरुन दिली आनंदाची बातमी

Deepika Padukone And Ranveer Singh: दीपिकानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

priyanka kulkarni

Deepika Padukone And Ranveer Singh: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे आई-बाबा होणार आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.(Deepika Padukone Pregnancy News) दीपिका आणि रणवीर यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दीपिका आणि रणवीरनं शेअर केली पोस्ट (Deepika Padukone And Ranveer Singh)

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". याचा अर्थ दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे.

दीपिकाच्या प्रेग्नसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होत्या. बाफ्टा पुरस्कार सोहळ्याला दीपिकानं हजेरी लावली. या सोहळ्यातील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. आता दीपिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “रणवीर आणि मला लहान मुले आवडतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आमच्या घरात नव्या सदस्याची एन्ट्री होईल.”

दीपिका आणि रणवीचे चित्रपट

'सिंघम अगेन' या चित्रपटातून दीपिका आणि रणवीर हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात रणवीर हा संग्राम ही भूमिका साकारणार आहे तर दीपिका ही शक्ती ही भूमिका साकारणार आहे.

2018 मध्ये बांधली लग्नगाठ

2018 मध्ये रणवीर आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ देखील दाखवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT