Pathaan Besharam Rang esakal
मनोरंजन

Pathaan Besharam Rang: दीपिकाचा 'बेशरम रंग', किंग खान सोबत भान सुटलं!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका ही भलत्याच बोल्ड अंदाजात दिसून आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone Besharam Rang Pathaan released: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका ही भलत्याच बोल्ड अंदाजात दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या सर्कसमधील करंट गाण्यानं लक्ष वेधून घेतले होते. आता ती शाहरुख सोबत एका वेगळ्याच अंदाजात दिसून आली आहे. नेटकऱ्यांनाही तिचा तो अंदाज भलताच भावला आहे.

शाहरुखच्या पठाण या चित्रपटातील बेशरम रंग नावाचे गाणे आज व्हायरल झाले आहे. ते गाणे व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. दीपिकाचा तो बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतो आहे. दीपिकानं चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे. अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स, व्ह्युज त्या व्हिडिओला मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहरुख आणि दीपिकाच्या त्या गाण्याची चर्चा होती.

दीपिकाचा इतका इंटिमेट अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. यापूर्वी तिचा काही महिन्यांपूर्वी गहराईया नावाचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये देखील तिनं बोल्ड भूमिका केली होती. त्यावरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला खूपच ट्रोल केले होते. आता ती पुन्हा शाहरुखच्या पठाणमध्ये बेशरम गाण्यामध्ये व्हायरल झाली आहे. हे गाणं प्रेक्षकांना कमालीचे आवडले आहे. मात्र त्यासगळ्यात चर्चा होते आहे ती दीपिकाच्या त्या बोल्ड लूकची. दीपिका आणि शाहरुखचं इंटिमेट होण हे नेटकऱ्यांना खूप भावलं आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून एका चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसते आहे. तो म्हणजे शाहरुखचा पठाण. कोरोनामुळे हा चित्रपट मागे पडला होता. त्याचा टीझर व्हायरल होऊन बरेच दिवस झाले होते. आता त्यातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया हाच चर्चेचा विषय झाला आहे. यापूर्वी आपण दीपिकाला इतक्या बोल्ड अंदाजात पाहिलं नसल्याचे नेटकऱ्यांनी तिचे ते गाणे पाहिल्यावर अभिप्राय दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT