deepika padukone 
मनोरंजन

बॉडीगार्डला दीपिका मानते भाऊ; देते तब्बल इतका पगार

स्वाती वेमूल

बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचं नाव आवर्जून घेतलं जातं. 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंवा दीपिका कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करतात. अशा वेळी तिच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही तिच्या बॉडीगार्डवर असते. दीपिकाच्या बॉडीगार्डचं नाव जलाल असून ती त्याला भाऊ मानते. रक्षाबंधनला राखी बांधताना फोटो दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून जलाल चांगलाच चर्चेत आला आहे. 

जलाल गेल्या अनेक वर्षांपासून दीपिकासाठी काम करतोय. दीपिकाच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जलालला ती किती पगार देते माहितीये का? जलालला वर्षभराचे तब्बल ८० लाख रुपये दीपिकाकडून मिळतात. ही आकडेवारी २०१७ ची असून आता त्याचा पगार १ कोटी रुपयांपर्यंत गेला असेल, असं म्हटलं जातं. दीपिका व रणवीर सिंहच्या लग्नातही जलाल सुरक्षारक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. 

दीपिकाप्रमाणेच बॉलिवूडमधील इतरही सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला पगार म्हणून भरभक्कम रक्कम देतात. अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा अनेकांनाच माहीत आहे. शेराला सलमानकडून वर्षभराचे दोन कोटी रुपये मिळतात. तर अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डला १.२ कोटी रुपये देते. प्रकाश सिंह असं तिच्या बॉडीगार्डचं नाव आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख त्याच्या बॉडीगार्डला सर्वाधिक पगार देत असल्याचं म्हटलं जातं. रवी सिंह हा गेल्या नऊ-दहा वर्षांपासून शाहरुखचा बॉडीगार्ड आहे. शाहरुख त्याला २.६ कोटी रुपये दर वर्षाला देतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT