deepika padukone Sakal
मनोरंजन

Deepika Padukone: 'हेयरस्टायलिस्ट घाईत होती वाटतं?' दीपिका ऑस्कर 2023 पार्टीतील लूकमुळे झाली ट्रोल

यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने प्रेजेंटर म्हणून प्रवेश केला. सध्या अभिनेत्रीच्या लूकची तुफान चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दीपिका पादुकोणने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचे स्थान पक्के केले आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर दीपिकाने यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून प्रवेश केला.

यावर्षीचा पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. कारण एक नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कार भारताने पटकावले आहेत. भारतीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता. ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट’ विभागात ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाने पुरस्कार पटकावला.

तर आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात बाजी मारली. ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू या गाण्यावर डान्स परफॉर्मन्सही पार पडला.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने परफॉर्मन्सची घोषणा स्टेजवर येऊन केली. पण जेव्हा संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेले तेव्हा दीपिका पादुकोण भावुक झाली.

दीपिका पदुकोणची पुरस्कार सोहळ्या दरम्यान लूकची देखील तुफान चर्चा रंगली. दीपिकाने ऑस्करच्या पार्टीसाठी पर्पल रंगाचा ग्लॅमरस फेदर ड्रेस घातला. दीपिकाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

काही चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक आवडला तर, काहींनी तिला ट्रोल केलं. एक युजर दीपिकाचे केस पाहून म्हणाला 'हेयरस्टायलिस्ट जरा घाईत होती वाटतं?', तर दुसरा युजर म्हणाला, 'भारतासाठी आज अभिमानाचा क्षण होता'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT