Deepika Padukone On PM Modi esakal
मनोरंजन

Deepika Padukone : दीपिकानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला कौतुकाचा वर्षाव, काय म्हणाली माहितीये?

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही तिच्या फायटर नावाच्या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Deepika Padukone On PM Modi : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही तिच्या फायटर नावाच्या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या फायटरचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. अशात दीपिका आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दीपिकानं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव आघाडीवर आहे. तसेच सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही दीपिकाचे नाव आहे. ग्लोबल स्टार म्हणून दीपिकाची वेगळी ओळख आहे.

Deepika Padukone Reaction On PM Modi

आता दीपिकानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. तिनं तिच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. दीपिका नेमकं काय म्हणाली हे आपण जाणून घेऊयात. मोदींनी काही दिवसांपूर्वी परीक्षा पे चर्चाच्या ७ व्या पर्वातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

मोदींनी विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन हे दीपिकाला भावले आहे. त्यानंतर तिनं खास पोस्ट शेयर करुन मोदींचे कौतुक केले आहे. दीपिकानं इंस्टावर शेयर केलेल्या त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद. त्यांनी ज्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले ते कौतुकास्पद आहे. दीपिकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी मोदींनी दिल्लीमध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. मोदींचा तो प्रेरणादायी संवाद नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT