Deepika Padukone  
मनोरंजन

'तो खूप कठीण काळ होता'; दीपिकाने सांगितला कोरोनाशी सामना करण्याचा अनुभव

दीपिकासोबतच तिचे वडील प्रकाश, आई उज्वला आणि बहीण अनिषा हे सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होते.

स्वाती वेमूल

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेलिब्रिटींना त्या विषाणूची लागण झाली होती. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone). दीपिकासोबतच तिचे वडील प्रकाश, आई उज्वला आणि बहीण अनिषा हे सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दीपिकाच्या कुटुंबीयांनी कोरोनाचा सामना केला. याबद्दल दीपिका नंतर फारशी कुठे व्यक्त झाली नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, तिने त्याच्या परिणामांविषयी सांगितलं. कोविडमधून दीपिका काही आठवड्यांत बरी झाली होती. मात्र त्यानंतर तिने जवळपास दोन महिने कामातून ब्रेक घेतला होता. तिचं मन कामासाठी पूर्णपणे तयार नव्हतं आणि तो खूप कठीण काळ होता, असं दीपिकाने सांगितलं. (Covid-19 battle)

'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, "कोविडचा सामना केल्यानंतर माझं आयुष्य बदललं, कारण शारीरिकदृष्ट्या मी स्वत:ला ओळखूच शकत नव्हते. मला वाटतं औषधं आणि स्टेरॉइट्सचा परिणाम होता. कोविडमध्ये तुम्हाला तुमचं शरीर, तुमचं मन यांचं संतुलन राखता येत नाही." दीपिकाने सांगितलं की कोरोनामुळे तिच्यावर तितकासा परिणाम झाला नाही, जितका तो होऊन गेल्यानंतर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे तिला कामातून ब्रेक घ्यावा लागला. "मला असं वाटलं की जेव्हा मला आजार झाला तेव्हा मी ठीक होते, पण त्यानंतर, माझं डोकं नीट काम करत नसल्यामुळे मला दोन महिन्यांची सुट्टी घ्यावी लागली. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता," असं ती पुढे म्हणाली.

दीपिकाचा 'गेहराइयाँ' हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही भूमिका आहेत. येत्या ११ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT